आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र

0
217

आजच्या काळात अनेक कुटुंबांमध्ये आई नोकरी अथवा व्यवसाय करीत आहे. दोन्हीकडच्या जबाबदार्‍या सांभाळताना तिची तारेवरची कसरत हाते असते. अशा वेळी घरातील इतर सदस्यांनीही मुलांवर संस्कार करण्यास वेळ द्यायला हवा. आईबरोबर वडिलांनीसुद्धा ही जबाबदारी आनंदाने स्वीकारायला हवी. एक ठरावीक वेळ द्यायला हवा. आईबरोबर वडिलांनीसुद्धा ही जबाबदारी आनंदाने स्वीकारायला हवी. एक ठरावीक वेळ वडिलांनी सुद्धा मुलांना द्यायला हवा. दिवसभरातून एक तास तरी मुलांजवळ बसायला हवे. त्यांना गोष्ट सांगणे, बागेत फिरायला घेऊन जाणे, सुट्टीच्या दिवशी सहलीला जाणे, तसेच एखाद्या दिवशी अनाथ आश्रमामध्ये जाऊन तेथील मुलांशी संवाद साधणे. थोडा वेळ मुलांचा अभ्यास घेणे, त्यांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करणे, त्यांच्याशी मायेनं-आपुलकीने वागणे या सर्व जबाबदार्‍यांमध्ये वडिलांचाही सहभाग हवा. आपल्या बाळासाठी आपण नाही वेळ देणार तर कोण देणार? लहान मुलांसोबत आपण वेळ घालविला तर आपलेही दुःख, नैराश्य भावना कमी होते, मन प्रफुल्लित राहते. श्लोकच्या आईला, ’पुढच्या वेळी येताना श्लोकच्या बाबांनाही घेऊन ये’ असे सांगितले. पुढच्या तपासणीला त्याचे बाबासुद्धा आले होते. दोघांनाही श्लोकशी सकारात्मक बोलायला सांगितले. तू असा वागू नको, आम्हाला त्रास देऊ नको असे नकारात्मक बोलणे टाळून, श्लोक खूप शहाणा मुलगा आहे. त्याची वस्तू तो जागेवर ठेवतो. त्याच्यासमोर तुम्हीपण प्रत्येक वस्तू जागेवर ठेवायला शिका. त्याने सर्व वस्तू जागेवर ठेवल्यावर त्याचे कौतुक करून एखादी भेटवस्तू त्या दिवशी त्याला द्या. त्याला प्रोत्साहन द्या, असे सांगितले. समजूतदारपणाने नीट शिकवायचा व वळण लावायचा प्रयत्न झाला, तर मुलाचा आत्मविश्वास नक्कीच वाढतो. तसेच तो इतरांवरही विश्वास ठेवायला शिकतो. शिस्त, नियम, वागणूक याचे अर्थ त्याला कळायला लागतात आणि ते पाळायचा आनंदही त्याला मिळतो. त्यामुळे मूल हळूहळू हसरे, खेळकर, आज्ञाधारक व समजूतदार होते. त्याची एकाग्रता वाढण्यासाठी दिवसातून दोन वेळा त्याच्याकडून ओंकारसाधना। करून घेण्यास सांगितली.

सोबत बुद्धिमत्ता वाढण्यासाठी आयुर्वेदिक औषधी योजना सुरू केली. शिरोधारा, नस्य हे पंचकर्मातील उपकर्म केले. एक महिन्यानंतर श्लोक त्याच्या आई-बाबांसमवेत आला. या वेळी तिघांच्याही चेहर्‍यावर । समाधान व आनंद दिसत होता. श्लोक आता बर्‍यापैकी शिस्तीत वागत होता. त्याची तपासणी झाल्यावर त्याची आई मला म्हणाली, डॉक्टर, आम्ही त्याला होस्टेलवर ठेवण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्याच्यासोबत आम्ही पण अभ्यासाला बसत असल्यामुळे तो आता आनंदाने अभ्यास करतो. त्याच्या आईचे बोलणे ऐकून मला खुप समाधान वाटले. कारण माझ्या समुपदेशनान उपचारांनी एका बालकाचे फुलपाखराप्रमाणे बागडण्याच्या वयातील जीवन बंदिस्त होण्यापासून वाचले होते.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- ८७९३४००४००