काही जणांना लहानपणा- पासूनच गडकिल्ल्यांवर जायची हौस असते. लहान वयात ट्रेकिंगची आवड डेव्हलप झाली की तरुणपणी हिंडायला आणखी मजा येते. अनेकदा नोकरी व्यवसायामुळे ट्रेकिंगला वेळ मिळत नाही. पण तुम्ही आयुष्यभर ट्रेकिंग करू शकता आणि त्याद्वारे पैसेही मिळवू शकता असं कोणी सांगितलं तर? माऊंटेनिअरिंगचा कोर्स केल्यावर तुम्ही ट्रेकिंगच्या जोरावर हिमालयातही नोकरी करू शकता! आपल्या देशात माऊंटेनिअरिंग शिकवणार्या अनेक संस्था आहेत. पण त्यातील सरकारी शिक्षणसंस्थांमध्ये शिकल्याचे फायदे जास्त आहेत.
अनेकदा ट्रिकिंगकडे फक्त छंद म्हणून बघितलं जातं. पण तुम्ही ट्रेकिंगसाठी खरोखरच पॅशनेट असाल तर माऊंटेनिअरिंगचे कोर्सेस करू शकता. हे कोर्सेस केल्यावर तुम्हाला त्याच संस्थेमध्ये ट्रेनर म्हणून नोकरी मिळू शकते. तसंच हिमालयात, सियाचीनला, किंवा तत्सम अतिशय अवघड ठिकाणी तुम्ही ट्रेकर गाइड म्हणूनसुद्धा काम करू शकता. तुम्हाला गडकिल्ल्यांची जास्त आवड असेल तर महाराष्ट्रातील अनेक ट्रेकिंगसाठीच्या संस्थांमध्ये जॉइन होऊ शकता. स्वतःची संस्थाही सुरू करू शकता. या संस्थेद्वारे तुम्ही नवीन ठिकाणं एक्सप्लोर करू शकता. यासाठी तुम्हाला लागणारं सगळं प्रशिक्षण माऊंटेनिअरिंगच्या कोर्सेसमध्ये दिलं जातं. रोप क्लाइंबिंगसाठी शिळांमध्ये दोरखंड कसे रोवायचे, बर्फाच्छादित प्रदेशात वाट कशी काढायची, फ्रोझन लेकवरून कसे जायचे, स्वतःसोबत इतरांना कसे जपायचे या सगळ्याचे प्रशिक्षण दिले जाते. तसंच काही अपघात घडला तर स्वतःचा आणि इतरांचा जीव कसा वाचवायचा, प्रथमो पचार कसा करायचा हेसुद्धा शिकवले जाते. वयाच्या अठराव्या वर्षापासून पस्तिसाव्या वर्षापर्यंत तुम्ही हे कोर्सेस करून करियर करू शकता. उत्तरकाशी मधील नेहरु माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, दार्जिलिंग मधील हिमालयन माऊंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट, मनाली म धील अटल बिहारी वाजपेयी इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग ऍण्ड ऍलाइड स्पोर्ट्स, पेहेलगाम येथील जवाहर इन्स्टिट्यूट ऑफ माऊंटेनिअरिंग ही विद्यापिठे उच्च प्रतीचं माऊंटेनिअरिंग प्रशिक्षण देतात. अशा विद्यापिठांमधून सुयोग्य प्रशिक्षण घेऊन तुम्ही ट्रेकिंगची आवडही जोपासू शकता आणि अर्थार्जनही करू शकता.