फळांवर मीठ टाकताय? सावधान!

0
62

फळे खाल्ल्याने शरीराला खूप फायदा होतो. शरीराला जीवनसत्त्वे, लोह आणि फायबरसारखी पोषक तत्त्वे मिळतात. एवढेच नाही, तर रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते. त्याच वेळी ते चयापचय देखील मजबूत करते; मात्र फळांच्या सॅलेडमध्ये किंवा फळांसोबत मीठ खाण्याचीसवय असेल तर लगेच बंद करा. मीठ किंवा चाट मसाला घालून फळे खाणे चवीसाठी उत्तम असले तरी शरीरासाठी हानिकारक असते. मीठ टाकून खाल्ल्याने फळांमधील मूळ पोषक घटक नष्ट होतात. फळांवर मीठ टाकताच पाणी बाहेर पडू लागते. त्यामुळे फळांचे पोषण कमी होते. असे वारंवार केल्याने किडनीच्या आजारची शक्यता उद्भवते. फळांमध्ये मीठ मिसळल्याने त्वचेच्या ऍलर्जीची शिकार होऊ शकता. शरीराला सूज येऊ शकते. उच्च रक्तदाबाची समस्या असल्यास फळे आणि मीठ मिसळून खाण्याची चूक करू नये. अशाने रक्तदाब वाढू शकतो. हृदयरुग्णांनीही फळांसोबत मीठ खाऊ नये. महत्त्वाचे म्हणजे, एका वेळी एकच फळ खावे. फ्रूट चाट खायला आवडत असेल तर फक्त गोड किंवा आंबट फळांची कोशिंबीर करावी. आंबट आणि गोड फळे एकत्र खाऊ नयेत. फळे कापल्यानंतर तासाभराच्या आत खावीत.