तरुण वयात हाडे ठिसूळ…

0
17

वाढत्या वयानुसार हाडे ठिसूळ व्हायला सुरूवात होते. हे नैसर्गिक असले तरी सध्या तरुणाईमध्ये हाडांची समस्या दिसून येत आहे. चुकीच्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढत आहेत. काही वर्षांपूर्वी फक्त वयस्कर व्यक्तींम ध्येच हाडांशी संबंधित आजार आढळून येत होते; परंतु हल्ली तरुणांनाही याचा सामना करावा लागत आहे. अचानक बसून उठता हाडांचा कट-कट असा आवाज येतो. आपल्यातील बरेचजण याकडे दुर्लक्ष करतात. मात्र यामुळे गंभीर समस्येला सामोरे जावे लागू शकते. बेथनी इस्ट्न या महिलेच्या बाबतीत अशीच एक घटना घडली. टॉयलेट सीटवर बसल्यावर तिच्या गुडघ्याची हाडे मोडल्याची घटना समोर आली. ही महिला इंग्लंडची रहिवासी असून गुडघ्याच्या ट्युमरशी झुंजत आहे. पायर्‍या चढून खोलीत जाताना अचानक तिच्या उजव्या पायात त्रास सुरू झाला. यामुळे ती थोडा वेळ थांबली आणि टॉयलेट सीटवर बसली. बसताना तिला गुडघ्याची हाडे मोडल्याचा आवाज आला. तेव्हा तिला प्रचंड वेदना जाणवल्या. बेथनीला जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले त्यावेळी गुडघ्याचा ट्युमर असल्याचे समोर आले. तिच्या गुडघ्याची मऊशार गादी कमकुवत झाली आहे. डॉक्टरांना ट्युमरमुळे गुडघा आणि जांघेतील हाडं बदलावी लागली.

हा आजार झालेले 99 टक्के रुग्ण ऑपरेशननंतर पूर्णत: चालू-फिरू शकत नाहीत. यासाठी त्यांना नव्याने चालायला शिकावं लागेल. तसंच रुग्ण कधीही उंच टाचेचे सँडल घालू शकत नाहीत, असे बेथनीने सांगितले. आपल्याला ऑपरेशननंतर चालण्यात यश आल्याचेही तिने सांगितले. आता बेथनी या आजारासंबंधी जनजागृती करते. तीव्र वेदना जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाह- नही तिने केले आहे. अमेरिकेतील ‘जॉन हॉपकिन्स मेडिसीन’च्या म्हणण्यानुसार, हा मोठ्या पेशींच्या ट्युमरमधील दुर्मिळ आणि धोकादायक आजार आहे. या प्रकारचा ट्युमर दोन हाडांच्या सांध्यांमध्ये वाढतो. हा ट्युमर फक्त गुडघेच नाही, तर डोळे, हात आणि पाय येथील हाडांमध्येही वाढताना दिसतो.