दातदुखीची विविध कारणं

0
21

अनेकांना दातदुखीचा त्रास होतो. कॅव्हिटीमुळे दातदुखीची समस्या निर्माण होते हे खरं असलं तरी यामागे इतर काही कारणंही असू शकतात.

दातांमध्ये टोचल्यासारखं दुखत असेल आणि काही खाल्ल्यावर किंवा चावल्यावर वेदनांमध्ये वाढ होत असेल तर हे जंतूसंसर्गाचं किंवा दात तुटल्याचं लक्षण असू शकतं. अशा वेळी तातडीने दंततज्ज्ञांना भेटायला हवं. दातांच्या वेदनेचं कारण शोधून काढण्यासाठी क्ष-किरण चाचणी केली जाते.

दातांच्या आरोग्याशी संबंधित नसणार्‍या काही कारणांमुळेही दातदुखी निर्माण होऊ शकते. सायनससारख्या त्रासामुळे दात दुखू शकतात.

संवेदनशीलता हे दातांच्या वेदनेचं एक कारण असू शकतं. गोड किंवा थंड पदार्थ खाल्ल्यावर दातांमध्ये झिणझिण्या आल्यासारखं वाटत असेल तर तुमचे दात संवेदनशील झाले आहेत असं समजावं.