आरोग्य सखी स्त्री स्वास्थ्याचे कानमंत्र चाळीशीनंतरही टिकवा तारुण्य

0
60

तर फ्रेंक्चर भरून येण्यास वेळ लागतो. कधी-कधी कायमचे अपंगत्व येते. चाळिशीनंतर डोळ्यांना चष्मा लागला तर चष्म्याचा वापर न चुकता करावा. म्हणजे आपोआपच दुर्घटना टळते. बयाच वेळेला मधुमेह झालेला असल्यामुळे दृष्टी कमी झालेली असते. अशा वेळी समोरील वाहन दिसत नाही. म्हणून शक्यतो रात्री वाहन चालवणे टाळावे. कामभावना ही सर्व प्राणिमात्रांच्या ठिकाणी उपजतच निर्माण झालेली प्रेरणा आहे. म्हणूनच आयुर्वेदिय ग्रंथकारांनी जीवन सफल होण्यासाठी धर्म-अर्थ-काम-मोक्ष ही चार उद्दिष्टे महत्त्वाची मानली आहेत. पती-पत्नीमधील शारीरिक संबंध हा त्यांच्यामधील साधलेला अत्यंत एकरूपतेचा संवाद असतो. जो त्यांना आयुष्यभर एकमेकांची साथ देण्यासाठी, संसारामध्ये काही संकटे आली तरी त्या संकटांना सामर्थ्याने तोंड देण्यासाठी, एकमेकांमधील कलह मिटवण्यासाठी, शरीर व मन संतुलनासाठी मदत करतो. ज्या दांपत्यांचे लैंगिक जीवन आनंदी व समाधानपूर्वक आहे. त्यांच्यामध्ये वार्धक्य अवस्था उशिरा सुरू होते, हे सिद्ध झाले आहे. म्हणूनच चिरकाल तारुण्य टिकवायचे असेल, तर कामजीवन तृप्त असले पाहिजे. जीवनामध्ये ताणतणाव कमी करण्यासाठी, स्वतः मध्ये आत्मविश्वास जागृत करण्यासाठी, संकटांना सामोरे जाण्याचे बळ मिळण्यासाठी व तारुण्य टिकवण्यासाठी, पती-पत्नीमध्ये लैंगिक संबंध समाधानकारक असायला हवे.

चाळिशीनंतर आरोग्याच्या कुठल्याही तक्रारीकडे दुर्लक्ष करू नये. चक्कर येणे, थकल्यासारखे वाटणे, घाम येणे, छातीत धडधडणे, उदास वाटणे असे कुठलेही शारीरिक व मानसिक लक्षण असले तरीही वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार करावेत. जर या वयात रक्तदाब, मधुमेह आणि पाळीबद्दलच्या समस्या असतील तर त्याची नियमितपणे औषधे घ्यावीत. औषधांमध्ये कॅल्शिअम, ’ब’ जीवनसत्त्वाच्या गोळ्या नियमितपणे व रक्तदाब असेल तर त्याचीही गोळी नियमितपणे घ्यावी. औषधे वेळेवर घ्यावीत. बन्याचशा स्त्रिया औषधे वेळेवर घेण्यामध्ये चालढकल करतात. परंतु असे केल्याने आरोग्य धोक्यात येते म्हणून आरोग्यदायी जीवनप्रणाली आपलीशी करण्यासाठी या सर्व नियम ांचे पालन करणे गरजेचे आहे. जसजसा काळ जातो तसतसे वय वाढत असते. काळ कोणासाठीही थांबत नाही. परंतु चाळिशीतही अगदी तरुणींना लाजवेल असा उत्साह टिकवणे, तेवढ्याच क्षमतेने, आत्मविश्वासाने, स्वावलंबीपणे एखादे काम मन लावून आनंदाने करणे गरजेचे आहे. शरीर व मन निरोगी, आनंदी ठेवून ’मी छान आहे’ असा आत्मविश्वास स्त्रीच्या मनामध्ये निर्माण झाला तर पुढील आयुष्य सुखाचे होईल.

डॉ. शारदा निर्मळ-महांडुळे

दुर्वांकुर वंध्यत्व निवारण व गर्भसंस्कार सेंटर

अहमदनगर मोबाईल नं- 8793400400