मुलांसाठी मेडिकल जनरल नॉलेज -व्हिटॅमीन डी चा सर्वोत्तम खाद्य स्त्रोत कोणता?

0
59

व्हिटॅमिन डी ची कमतरता ही खूप माणसांमध्ये असते. भारतात सुद्धा आता 80%-90% लोकांम ध्ये कमतरता आहे पण भारतात व्हिटॅमिन डी चे शरीरातील प्रमाण तुम्ही सांगितल्या शिवाय तपासले जात नाही. फार पूर्वी उन्हातान्हात काम करणार्‍यांची संख्या अधिक होती पण आता कार मध्ये फिरणारे आपण किंवा दिवसभर ऑफिसमध्ये, शाळेत, घरात इत्यादी ठिकाणी बसणारे सर्वजण उन्हात फार कमी वेळ असतो. सकाळचे कोवळे ऊन आपण लहान बाळाला देतो कारण या उन्हात राहिलो तर आपले शरीरात व्हिटॅमिन डी तयार करते. पण सकाळच्या कोवळ्या उन्हात रोज बाहेर फिरणे आपल्याला शक्य होईलच असे नाही तर आपण व्हिटॅमिन डी साठी काय खावे ते आता पाहू – हा मासा सगळ्यात जास्त स्त्रोत आहे व्हिटॅमिन डी चा अमेरिका, जपान या देशात जास्त प्रमाणात ते खातात. रावस हा तुम्ही इंडियन salmon म्हणून व्हिटॅमिन डी साठी खाऊ शकता. इंडियन मॅक्रेल म्हणजे बांगडा हा उत्तम स्त्रोत आहे. या व्यतिरिक्त तुम्ही cod liver oil च्या गोळ्या घेऊ शकता.

मी पाहिले आहे की भारतात खूप शाकाहारी लोक मशरूमचे सेवन करत नाहीत पण मशरूम हा एकमेव भाज्यांमधून मिळणारा व्हिटॅमिन डी चा स्त्रोत आहे. मशरूम बाजारातून आणले की सकाळी दुपारी 10 ते 3 या वेळेत उन्हात ठेवावे. मशरूम न धुता शक्यतो पेपर टॉवेल ने पुसून घ्यावे. अमेरिकेत खूप प्रकारचे मशरूम मिळतात आता भारतात सुद्धा दोन-तीन प्रकारचे मिळतात. मशरूमच्या चकत्या करून किंवा तुकडे करून नुसते पॅनमध्ये परतून (टॉस करून त्याला पाणी सुटते ते आटून मशरूमचा रंग बदलतो आणि छान वास सुटतो तोपर्यंत) त्यात तिखटमीठ घालून खाल्ले तरी छान लागतात किंवा पिझ्झा सॉसमध्ये परतून किंवा वाफवलेल्या सिमला मिरची सोबत छान लागतात. मशरूम सूप छान लागते. मशरूम जरुर खावेत. बरेच अंड्यातील पिवळा बलक फेकून देतात किंवा खात नाहीत पण यातूनही व्हिटॅमिन डी मुबलक प्रमाणात मिळते. याव्यतिरिक्त संत्री, सोया दूध, चीझ हे सर्व पदार्थ खाऊन सुद्धा व्हिटॅमिन डी च्या गोळ्या नियमित घेत रहाव्यात. शरीरातील हाडांच्या बळकटीसाठी खूप गरजेचे आहे डी जीवनसत्त्वाचे योग्य प्रमाण. तेंव्हा डी जीवनसत्वाचे प्रमाण तपासा आणि ते योग्य प्रमाणात ठेवण्यासाठी आवर्जून प्रयत्न करा.