सामना ऍलर्जीचा

0
112

जगभरातल्या माणसांना विविध पदार्थांची ऍलर्जी असते. मासे, गाईचं दूध, अंडी आणि शेंगदाण्याची ऍलर्जी असणार्‍यांची संख्या बरीच जास्त आहे. शेंगदाण्याची ऍलर्जी असेल तर ऍनाफिलॅक्सिस नावाचा विकार होऊ शकतो. हा गंभीर स्वरूपाचा विकार आहे. यामुळे रूग्णाचा मृत्यू होण्याची शक्यता असते. 20 पैकी एका मुलाला तर 50 पैकी एका प्रौढाला अन्नपदार्थांची ऍलर्जी होण्याची शक्यता असते. त्यात दाण्याची ऍलर्जी असणार्‍यांची संख्या जास्त असते. पण यावरचा उपाय शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आलं आहे. या विकारावर दीर्घकालीन उपचारांचा शोध शास्त्रज्ञांनी लावला आहे. हा विकार पूर्णपणे बरा होण्यासाठीचं औषधही लवकरच शोधलं जाईल, अशी आशा यामुळे निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये हे संशोधन करण्यात आलं. या प्रयोगासाठी दाण्याची ऍलर्जी असलेल्या मुलांना प्रोबायोटिक तसंच पीनट प्रोटिनचा डोस देण्यात आला. साधारण 18 महिन्यांपर्यंत हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगाच्या अंती 80 टक्के मुलं दाण्यांचं सेवन करू शकली. शास्त्रज्ञांच्या दृष्टीने हा मैलाचा दगड मानला जात आहे.