पोषक आहार महत्त्वाचा

0
66

दैनंदिन जीवनात आहाराकडे विशेष लक्ष द्यायला हवं. सकाळी गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्या तसंच उकडलेल्या किंवा परतलेल्या भाज्या खा. दिवसभरात दोन ते तीन कप ग्रीन टी प्या. भरपूर पाणी प्या. आहारात फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. नियमित व्यायाम करा. ताजी फळं, भाज्या खा. फळांचे रस घ्या. चहा- कॉफीचं प्रमाण कमी करा. नारळपाणी, लिंबू पाणी प्या. मिठाचं प्रमााण कमी करा. आहारात पापड, लोणची घेऊ नका. तेलकट पदार्थांना फाटा द्या. शांत झोप घ्या. पुरेशा झोपेमुळे तुम्ही ताजेतवाने होऊ शकता. उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. या काळात पाणी भरपूर पिणे आवश्यक आहे. त्यामुळे शरीराची ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत होते.