आरोग्यदायी चणे

0
28

चणे अत्यंत आरोग्यदायी मानले जातात. कर्बोदकं, प्रथिनं, तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर, कॅल्शियम आणि लोह हे घटक मुबलक प्रमाणात असतात. रोज रात्री 50 ग्रॅम चणे भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी खाल्यानं आरोग्यविषयक अनेक लाभ होतात. चण्यांमुळे होणार्‍या आरोग्यविषयक लाभांबद्दल जाणून घेऊ.

चण्यांमध्ये प्रथिनं भरपूर प्रमाणात असल्यानं भूक लवकर लागत नाही. यामुळे वजन नियंत्रणात ठेवायला तसंच कमी करायला मदत होते.

चण्यांमधला ग्लायसेमिक इंडेक्स बराच कमी असतो. तसंच यातल्या फायबर आणि प्रथिनांमुळे रक्तातलं साखरेचं प्रमाण नियंत्रणात राहायला मदत होते.

चण्यांमध्ये लोहाचं मुबलक प्रमाण असल्यानं ऍनिमिया असलल्यांसाठी ते लाभदायक ठरतात.

यात अल्फा लिनोलेनिक आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. यामुळे शरीरातलं कोलेस्ट्रॉल कमी होण्यासोबतच हृदयविकारापासून बचाव होतो.

कमी झोपेची समस्या असणार्‍यांनी चणे खावेत. यात अमिनो ऍसिड, ट्रायप्टोफॅन आणि सेरोटोनिन हे घटक असतात. यामुळे शांत झोप लागण्यास मदत होते.

चण्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाणही मुबलक असतं. यामुळे हाडं बळकट होतात.

चण्यांमधील फॉस्फसरमुळे रक्तातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते आणि किडनीतलं अतिरिक्त मीठ बाहेर पडण्यास मदत होते.

चणे खाल्ल्याने ताणतणाव दूर व्हायला मदत होते.

चण्यातील पोषक घटकांमुळे अशक्तपणा दूर होतो. चण्यातील फॉस्फरस, मँगनीजसारख्या खनिजांमुळे त्वचाविकार दूर होतात.