नगर – शिर्डी नगरपंचायतीने महिला सफाई व स्वच्छता कर्मचार्यांना कामावरून अचानकपणे काढल्याने त्या महिलांना पुन्हा कामावर हजर करण्याच्या मागणीसाठी भारतीय दलित महासंघाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करताना सुनील उमाप, पावलास पवार, प्रेम गाडे, रमेश नवगिरे, बाळासाहेब नेटके, कविताताई नेटके, कर्मचारी सौ. संगीता आरने, नूतन रणदिवे, सुरेखा दिवेकर, हमिदा सय्यद, बेबी खैरे, निर्मला पाचोरे, अनिता कुसळकर, सरिता
गुंजाळ आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी नगरपंचायतीमध्ये १० ते १५ वर्षांपासून कंत्राटी सफाई व स्वच्छता कामगार म्हणून काम करीत आहेत तरी सर्व कर्मचारी हे गरीब परिवारातील असून त्यांचा प्रपंच व परिवार याच कामावर अवलंबून आहे. सर्व कर्मचारी अनेक वर्षापासून संबंधित नगरपंचायतीमध्ये प्रामाणिकपणे स्वच्छतेचे व सफाईचे काम करीत आहे. अनेक वर्षापासून त्यांच्या कामापासून नगरपंचायतीचे प्रामाणिक सेवा करीत आहे. हे सर्व महिला कर्मचारी असून कामावरून अचानक कमी केल्यामुळे अन्याय व उपासमारीची वेळ आलेली आहे. या महिलांना पुन्हा कामावर हजर करून घ्यावे.





