नगर- श्री रामकृष्ण अर्बन सहकारी क्रेडिट सोसायटीच्या २० एप्रिल रोजी होणार्या पंचवार्षिक निवडणुकीचा संस्थापक अध्यक्ष श्रीगोपाल धूत प्रणित सदभावना पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मंगळवारी माळीवाडा येथील ग्रामदैवत श्री विशाल
गणेश मंदिरात संत रमाकांत व्यास यांच्या हस्ते करण्यात आला.
सुरुवातीला रमाकांत व्यास यांच्या हस्ते गणपतीची आरती करण्यात आली. माजी आमदार अरुण जगताप यांच्या प्रकृती स्वास्थ्या करिता प्रार्थना करण्यात आली. याप्रसंगी रमाकांत व्यास यांनी रामकृष्ण अर्बन सोसायटीच्या उत्तम कामगिरीचा गौरव केला. तसेच मी स्वतः संस्थेचा सभासद असून संस्थेची प्रगती पाहता या संस्थेला यंदा ४ कोटीचा
निव्वळ नफा होईल. अशी अपेक्षा व्यक्त करून संस्थेचा भक्कम आर्थिक पाया पाहता. श्रीगोपाल धूत यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटीचे रूपांतर बँकेत करावे, असे आवाहन पॅनलच्या सर्व उमेदवारांना केले. तसेच रामकृष्ण सारख्या आर्थिक संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी व संस्थेचा निवडणुकीतील होणारा मोठा खर्च वाचावा. याकरिता अपक्ष उमेदवारांना निवडणूक बिनविरोध होण्याकरिता सहकार्य करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी उपस्थितांचे उमेदवार लक्ष्मीकांत झंवर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पॅनलच्या वतीने उमेदवार किसनलाल बंग व विशाल गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अभय आगरकर यांनी रमाकांत व्यास यांचा श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान केला.
प्रचाराचा शुभारंभ प्रसंगी विशाल गणेश मंदिराचे ट्रस्टी अशोक कानडे, पंडितराव खरपुडे, ज्ञानेश्वर रासकर, विजय कोथिंबिरे यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मर्चंट बँकेचे संचालक अनिल पोखरणा, संजय चोपडा, आनंदराम मुनोत, कमलेश भंडारी, प्रा.शरद कोलते, उद्योजक नरेंद्र फिरोदिया, गिरीश अग्रवाल, राजेंद्र बोथरा, अशोक पितळे,
आदेश चंगेडिया, डॉ.श्रीकांत गांधी, मोहनलाल मानधना, सुभाष जग्गी, सुवेंद्र गांधी, ब्रिजलाल सारडा, अॅड.शरद पल्लोड, सतीश लोढा, राजेंद्र चोपडा, दीपक काबरा, पराग धोकरीया, अशोक खंडेलवाल, अजय पंजाबी, ओमप्रकाश बंग,
बजरंग दरक, सत्यनारायण बंग, चंद्रकांत मुथा, मदन गुजराथी, मनोज मुंदडा, श्रीकुमार सोनी,राकेश गुप्ता, ललिता झंवर, रंजना सोनी, सुनीता कासट, अलका मुंदडा, ज्योती गांधी, अपर्णा नहार, प्रशांत जाजू, दर्शन गुजराथी, मनोज
गुजराथी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी उमेदवार श्रीगोपाल धूत, राजेंद्र गुजराथी, प्रदीप पंजाबी, सुधीर झालानी, प्रकाश गांधी, लक्ष्मीकांत
झंवर, किसनलाल बंग, ओमप्रकाश चांडक, विश्वनाथ कासट, गोपाल मणियार, राजेंद्र मालू, मधुसूदन सारडा,
अँड.अशोक बंग, राजेंद्रकुमार कंत्रोड, अनुराग धुत, राजकमल मणियार, शोभा राठी, साईनाथ कावट,
अनुरीता झगडे, देवराव साठे हे सर्व उमेदवार उपस्थित होते. ओमप्रकाश चांडक व गोपाल मणियार यांनी आभार
मानले.