नगर – अहिल्यानगर शहरातील मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण सोहळ्याचा कार्यक्रम १० एप्रिल रोजी केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांच्या हस्ते व प्रमुख आरपीआय नेत्यांच्या उपस्थितीत होणार होते. परंतु नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे वडील माजी आमदार अरुण जगताप यांची
प्रकृती खालवल्याने या पुतळा अनावरण कार्यक्रमास तात्पुरती स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीच्या वतीने मनपा उपायुक्त यांना पत्र देण्यात आले. तसेच अरुण जगताप यांनी आंबेडकरी चळवळीस डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या स्थापनेपासून कायम पूर्णाकृती पुतळा होईपर्यंत सहकार्य व
योगदान दिलेले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जगताप परिवाराच्या पाठीशी ठाम राहण्याचा निर्णय डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा समितीने घेतला असून पुतळा समिती पुढील महिन्यात पुन्हा एकदा सर्व
राष्ट्रीय नेत्यांच्या व गायकांच्या तारखा घेऊन पुतळा अनावरण कार्यक्रमाची तारीख जाहीर करतील. असा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला व अरुण जगताप यांना दीर्घायुष्य लाभो यासाठी सामूहिक बौद्ध वंदना घेण्यात आली. यावेळी मनपाचे अभियंता परिमल निकम, सुरेश बनसोडे, सुमेध गायकवाड, अजय साळवे, संजय कांबळे, सुनील शिंदे, सुनील
शेत्रे, माजी नगरसेवक प्रशांत गायकवाड, योगेश साठे, प्रा.जयंत गायकवाड, संजय जगताप, अशोक
खंडागळे, महेश भोसले, नितीन कसबेकर, अंकुश मोहिते, सिद्धार्थ आढाव, विशाल गायकवाड, कौशल
गायकवाड, विशाल भिंगारदिवे, सागर ठोकळ, शुभम बडेकर, सचिन साठे, दिनेश पंडित, सचिन शेलार, निशांत चव्हाण, सिद्धांत गायकवाड, विश्वभूषण गायकवाड, संभाजी भिंगारदिवे, सुजल भिंगारदिवे, तुकाराम गायकवाड, भीम वाकचौरे,
योगेश घोडके, संदीप वाघमारे, विजय गायकवाड आदीसह समितीचे पदाधिकारी उपस्थित होत