नगर – अहिल्यानगर शहरातील शासकीय विश्राम गृह येथे भीमशक्तीचे संस्थापक अध्यक्ष तथा खासदार चंद्रकांत हंडोरे यांच्या आदेशानुसार भीमशक्तीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक झाली. यात
शहराची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यावेळी भीमशक्तीचे प्रदेशाध्यक्ष भाऊसाहेब साठे, शहर जिल्हा
अध्यक्ष संजय जगताप, जिल्हा प्रभारी अध्यक्ष सुदामराव सरोदे, दक्षिण जिल्हा अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, उत्तर जिल्हा
अध्यक्ष संदीप मतकर, कार्याध्यक्ष हुसेन देशमुख, जिल्हा सचिव पोपटराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड
करून पत्र वाटप करण्यात आले.
यावेळी सुदाम सरोदे, विनायक साठे, सोमनाथ भोसले, अभिजीत सिंग, यश गायकवाड, ओम अहिरे, मयूर पांढरे, प्रथमेश वाघ, कौस्तुभ आडेप, पियुष वाघमारे, वेदांत थोरात, सुनील आडोळे, तेजस पांढरकर, तुषार साळवे, सनी गाढवे, प्रेम साठे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी शहर कार्यकारणी शहर जिल्हा अध्यक्ष संजय जगताप, उपाध्यक्ष अभय गायकवाड, शहर सचिव विशाल भिंगारदिवे, संघटक भाऊसाहेब भिंगारदिवे, संघटक रिजवान सय्यद, शहर जिल्हा संपर्कप्रमुख विनायक साठे, शहर संघटक सुनील ठाकरे, संघटक विवेक चंदनशिव, प्रसिद्धीप्रमुख अशोक खंडागळे अधिक पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.