नगर – येथील कवयित्री, मुक्त पत्रकार सरोज आल्हाट यांचा महिलादिनी राज्यस्तरीय नारी सन्मान पुरस्काराने गौरव करण्यात आला. गेल्या अठरा वर्षांपासून सामाजिक तथा साहित्यिक उपक्रम राबविणार्या उपदेशक आयोजित राज्यस्तरीय महिला मेळाव्यात आल्हाट यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉन बॉस्को येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात उपदेशकचे संस्थापक विक्रम गायकवाड यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आल्हाट यांना प्रदान करण्यात आला. या वर्षाची जागतिक महिला दिनाची थीम असलेली एसलरेट शन अर्थात फक्त चर्चा न होता वेगाने कृती करा! या विषयावर सरोज आल्हाट यांनी मार्गदर्शन केले. महिलांवर होणार्या अत्याचारावर आल्हाट यांनी स्वरचित मदर इंडिया ही कविता सादर केली. या कवितेला उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.