सचिवपदी सीए महेश तिवारी तर खजिनदारपदी सीए महेश भळगट; अहमदनगर सीए शाखेच्या नविन कार्यकारिणीचा पदग्रहण समारंभ
नगर – अहमदनगर सीए शाखेच्या २०२५-२९ सालाकरिता व्यवस्थापकीय समितीच्या सभासदांसाठी निवडणूक नुकतीच झाली. यात नवनिर्वाचित सभासदांमधून सन २०२५-२६ या वर्षासाठी पदाधिकार्यांची निवड करण्यात आली.
शाखेचे मावळते अध्यक्ष सीए सनित मुथा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत खालीलप्रमाणे पदाधिकार्यांची निवड करण्यात आली. अध्यक्ष – सीए प्रसाद पुराणिक, उपाध्यक्ष व विकासा अध्यक्ष – सीए अभयकुमार कटारिया, सचिव – सीए महेश तिवारी, खजिनदार – सीए महेश भळगट, सभासद – सीए सुनंदा रच्चा, सीए चांसी आगरवाल.
सीए प्रसाद पुराणिक हे मावळते उपाध्यक्ष असून, एकमताने त्यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सीए अभयकुमार कटारिया यांची उपाध्यक्ष पदाबरोबरच सीए विद्यार्थी शाखेच्या (थखउअडअ) अध्यक्षपदीही निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकार्यांचा पदग्रण समारंभ ७ मार्च रोजी सीए भवन येथे पार पडला. या कार्यक्रमाला आयसीएआयचे सेंट्रल कौन्सिल मेंबर सीए मंगेश किनरे उपस्थित होते.
प्रथम मावळते अध्यक्ष सीए सनित मुथा यांनी स्वागत करून नूतन पदाधिकार्यांची घोषणा केली. यावेळी त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना नगर सीए शाखेच्या आपल्या प्रवासात सहभागी सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
नूतन अध्यक्ष सीए प्रसाद पुराणिक यांनी निवडीबद्दल आभार मानून ध्येय, धोरण व येत्या वर्षातील उपक्रमाविषयी माहिती दिली.
नूतन उपाध्यक्ष सीए अभयकुमार कटारिया यांनी विद्यार्थी शाखेचे नूतन अध्यक्ष म्हणून उपक्रमाविषयी माहिती दिली.
तसेच सचिव सीए महेश तिवारी व खजिनदार सीए महेश भळगट, सभासद सीए सुनंदा रच्चा व चांसी आगरवाल यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सीए मंगेश किनरे यांनी बोलताना प्रथम सर्व नूतन पदाधिकार्यांचे अभिनंदन केले. तसेच नगर सीए शाखेला व विद्यार्थी शाखेला सन २०२४-२५ साठी उत्कृष्ठ शाखेचा प्रथम पुरस्कार मिळाल्याबद्दल नगर शाखेचेही अभिनंदन केले. नूतन पदाधिकार्यांना अधिक कार्यक्षमतेने व प्रभावी काम करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी नगर शाखेचे माजी अध्यक्ष सीए मोहन बरमेचा, सीए आयपी अजय मुथा व सीए ज्ञानेश कुलकर्णी यांची भाषण झाले. कार्यक्रमाला माजी अध्यक्ष सीए संजय देशमुख, सीए मिलिंद जांगडा, सीए सुशील जैन, सीए प्रसाद भंडारी, सीए (डॉ.) परेश बोरा, सीए संदीप देसरडा, सीए पवनकुमार दरक, सीए ज्ञानेश्वर काळे तसेच इतर सीए सभासद आदी उपस्थित होते.
उपाध्यक्ष सीए अभयकुमार कटारिया यांनी आभार मानले तर सीए शतानंद कळेढोणकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केल