नामांकित कंपनीच्या क्लासचा नगरमधील कामगार विद्यार्थ्यांच्या फी चे ४ लाख ७५ हजार रुपये घेवून पसार

0
32

नगर – आकाश बायजूस या नामांकित कंपनीच्या नगरमधील शाखेत काम करत असलेल्या इसमाने विद्यार्थी व पालकांकडून लासच्या फी पोटी जमा केलेले ३ लाख ८५ हजार ४७७ रुपये कंपनीच्या बँक खात्यात न भरता तसेच कंपनीने दिलेले २ लॅपटॉप, १ टॅब असा ४ लाख ७५ हजार ४७७ रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केल्याचा प्रकार नगर मध्ये उघडकीस आला आहे. याबाबत कंपनीचे मृत्युंजय तापेश्वर सिंग (रा. तपोवन रोड, नगर) यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सचिन भागीरथ भटाटे (रा. गायकवाड एव्हेन्यु, प्रेमदान चौक, सावेडी) याच्या विरुद्ध कंपनीचा विश्वासघात केल्या प्रकरणी भा.दं. वि.कलम ४०६, ४०८ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

आकाश बायजूस या नामांकित कंपनीची नगरमध्ये प्रेमदान चौक येथे गायकवाड एव्हेन्यु येथे शाखा आहे. या शाखेत सचिन भागीरथ भटाटे हा कार्यरत होता. त्याने डिसेंबर २०२३ ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विद्यार्थी आणि पालकांकडून लासच्या फी पोटी जमा झालेले ३ लाख ८५ हजार ४७७ रुपये कंपनीच्या बँक खात्यात भरले नाहीत. तसेच कंपनीने त्याला विश्वासाने कार्यालयीन कामासाठी दिलेले २ लॅपटॉप, १ टॅब असा ४ लाख ७५ हजार ४७७ रुपयांचा ऐवज घेवून पोबारा केला. कंपनी व्यवस्थापनाने त्याच्याशी अनेकदा संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्याचा संपर्क न झाल्याने शेवटी कंपनीच्या प्रतिनिधीने शुक्रवारी (दि.७) तोफखाना पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.