विचार भारती व उत्कर्ष फौंडेशनतर्फे नादसंगम फ्युजन कार्यक्रम

0
19

नगर – विचार भारती व उत्कर्ष फाउंडेशन आयोजित अहिल्यादेवी होळकर सांस्कृतिक महोत्सवात नादब्रह्म संगीतालय, प्रस्तुत पवन श्रीकांत नाईक निर्मित नादसंगम-फ्युजन हा मराठी, हिंदी, पंजाबी व ब्रज भाषेतील गीतांची मैफल झाली त्यास प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला. यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे, निमंत्रक बलभीम पठारे, सुधीर लांडगे, अनिल मोहिते आदी उपस्थित होते या कार्यक्रमात विशेष सहभाग सरोज पालडीया यांचा होता. यामध्ये साथसंगत करणारे कल्याण मुरकटे व पवन नाईक (संवादिनी), स्मिता राणा (सतार), महेश लेले (व्हायोलिन), कुलदीप चव्हाण (बेंजो), शेखर दरवडे (तबला), रुद्र कुलकर्णी (डर्बूके व काहून), प्रणव देशपांडे (सिंथेसाईझर) होते तर सहवादक अनुज दरवडे, सहगायक श्रेयस शिंत्रे, नवरतन वर्मा, पवन तळेकर, विजय जाधव, निनाद पारखी, मुलांशू परदेशी व संकेत गांधी हे होते तर निवेदक सुनील मधुकर कात्रे यांनी केले.

मैफलिची सुरुवात महिला सबलीकरण या आशेचे प्रत्युषा (एक नवी पहाट)हे मराठी भाषेतील गीताने झाली. हे गीत अहिल्यानगरचे कवी संजोग धोत्रे यांनी लिहीले व संगीत पवन नाईक यांचे होते. ब्रज भाषेतील अहीर भैरव रागातील पारंपारिक बंदिश अलबेला सजन आयोरी या रचनेत नाईक सरांबरोबर सरोज पालडीया गायिकेने रंगत भरली. मिराबाईंची रचना सासोंकी मालाने प्रभू राम व कृष्ण दर्शन घडविले. सिंधी-पंजाबी भाषेतील झूलेलाल गीत बैरागी राग गीताने हिदूस्तानी सिंधु संस्कृतीच्या स्मृती उजागर केल्या. अहिल्यादेवींची आठवण व कार्य कर्तृत्वाची जाण देत तेरे वाजो ह्या गीताने मैफलिची सांगता झाली.