‘दीनदयाळ परिवार व सुरभि हॉस्पिटल’च्या उपक्रमातून शासनाच्या ‘आयुष्यमान भारत’ योजनेतील उद्दिष्टांची पूर्ती

0
37

मोफत सर्व रोग निदान महाशिबिरास उस्फूर्त प्रतिसाद, तब्बल ७५० रुग्णांनी नोंदविला सहभाग

नगर – वैद्यकीय क्षेत्रातील आधुनिक उपचार पद्धती सामान्य रुग्णांना परवडणारी नाही. तसेच औषधोपचाराचा खर्चही मोठ्या प्रमाणात आहे. नगर शहरातील रुग्णांची गरज लक्षात घेऊन प्रत्येक गरजू रुग्णांपर्यंत पोहोचून त्यांना, ’दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान’च्या माध्यमातून सवलतीच्या दरात अत्याधुनिक वैद्यकीय उपचार सुविधा उपलब्ध करून देण्याचा ’सुरभि हॉस्पिटल’चा उपक्रम अतिशय स्तुत्य असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ’आयुष्यमान भारत’ योजनेतील उद्दिष्टांची पूर्तता करणारा आहे, असे गौरवोद्गगार महसूल मंत्री, तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काढले. पंडित दीनदयाळ परिवार प्रतिष्ठान, पं.दीनदयाळ पतसंस्था व सुरभि हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने सुरभि हॉस्पिटल येथे सर्व रोगनिदान महाशिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी विखे पाटील बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक वाल्मिक कुलकर्णी होते तर व्यासपीठावर पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन वसंत लोढा, सुरभि हॉस्पिटलचे चेअरमन अनिरुद्ध देवचक्के, दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनंजय तागडे, महासचिव बाळासाहेब भुजबळ, वैद्यकीय संचालक डॉ.वैभव अजमेरे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे आदी उपस्थित होते. विखे पाटील म्हणाले की, सुरभि हॉस्पिटलने मुंबई पुण्यापेक्षा अधिक अत्याधुनिक सुविधा नगरसारख्या शहरात निर्माण केल्या आहेत.त्या निश्चितच कौतुकास्पद आहेत. पंडित दीनदयाळ परिवार व पतसंस्थेने आरोग्य महाशिबिराचे आयोजन करून आपली सामाजिक जाणीव कायम ठेवली.

भविष्यात या दोन्ही संस्थांनी मिळून शहरातील आरोग्य सेवा अशीच लोकाभिमुख करावी. अशी अपेक्षा विखे पाटील यांनी व्यक्त केली. वसंत लोढा म्हणाले की, पंडित दीनदयाळ यांनी देशहितासाठी केलेल्या अजरामर कामाचा आणि ज्वलंत देशभक्तीपर विचारांचा वारसा डोळ्यासमोर ठेवून संस्थेची वाटचाल असल्याने समाजहिताची भावना जोपासूनच सुरभि हॉस्पिटलच्या सहकार्याने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. समाजातील सर्व घटकांनी त्याला अतिशय उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. वाल्मिक कुलकर्णी यांनी देखील यावेळी आपल्या मनोगतातून या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या अनिरुद्ध देवचक्के यांनी प्रास्ताविकात हॉस्पिटल मधील सर्व अत्याधुनिक आरोग्य सुविधांची माहिती दिली. या महाशिबिरात ७५० रुग्णांनी आपला सहभाग नोंदविला.

यावेळी हृदयविकार तज्ज्ञ डॉ.अमित भराडिया, न्यूरोसर्जन डॉ.भगवान आगे, मधुमेह तज्ज्ञ डॉ.प्रियन जुनागडे, लॅप्रोस्कॉपिक सर्जन डॉ.श्रीतेज जेजुरकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ.विलास व्यवहारे, भूलतज्ज्ञ डॉ.भूषण लोहकरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुलभा पवार, रेडिओलॉजिस्ट डॉ.कोमल अजमेरे, ब्रेस्ट कॅन्सर सर्जन डॉ.तेजश्री जुनागडे, प्लास्टिक सर्जन डॉ.मायावती मरकड, डॉ. रिचा पितळे, संचालक व मुख्य प्रशासकीय अधिकारी अ‍ॅड. गणेश शेंडगे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर जंगम, संचालक बिझनेस डॉ. अमितकुमार पवार, डॉ. गणेश जंगले, डॉ.विनायक शिंदे, डॉ.मंदार शेवगावकर, डॉ.अमित पवळे, डॉ.प्रितेश कटारिया, डॉ. नितीन फंड, डॉ.दीपक जाधव, डॉ.सुनील आवारे, दीनदयाळ परिवार प्रतिष्ठानच्या वतीने शिबिर प्रमुख सोमनाथ चिंतामणी, गौतम दीक्षित, संग्राम म्हस्के, सुरज अग्रवाल, सुखदेव दरेकर, मुकुल गंधे, नरेंद्र श्रोत्री, संचालक बाबासाहेब साठे, महावीर कांकरिया, भाजपचे सरचिटणीस सचिन पारखे, प्रशांत मुथा, धनंजय जाधव, नितीन शेलार, संतोष गेनाप्पा, पोपट पाथरे आदींसह पतसंस्थेचे संचालक, डॉटर्स, पंडित दीनदयाळ परिवाराचे सदस्य उपस्थित होते. या शिबिरात नगर शहर, सावेडी उपनगर भिंगार,केडगाव, सिद्धार्थनगर, पटवर्धन चौक आदी परिसरातून रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला. सूत्रसंचालन शारदा होशिंग यांनी केले. तर प्रतिष्ठानचे महासचिव बाळासाहेब भुजबळ यांनी आभार मानले.