दिल्लीगेटला दिवसा कंटेनर आला कसा ?

0
25

नगर – शहरात अवजड वाहने दिवसा बंदी असूनही येतात, यामध्ये अनेकांचे बळी गेले आहे. तरी ३१ मे रोजी सकाळी ११ वा मोठा कंटेनर आला. त्यासमोरून एक ट्रक आला आधीच येथे अतिक्रमण व ट्राफिक जामचा प्रॉब्लेम त्यात अहिल्यादेवी जयंतीची मिरवणूक येणार होती. अमरधामकडून हा कंटेनर आला. शहराचा प्रवेश करणार्‍या सर्व हायवेवर पोलीस बंदोबस्त असताना हा कंटेनरला कोणी कसे अडवले नाही, या कंटेनरमुळे ट्राफिक जॅम झाली व त्याला अरुंद रस्त्यामुळे निघायला पण प्रॉब्लेम आला एखाद्याचा जीव गेला कि पोलीस तेवढयापुरते कारवाई करते शहरात अवजड वाहनांना दिवसा बंदी असूनही ते इतर कोणाच्या आशीर्वादाने प्रवेश करतात हेही पहिले पाहिजे, टू व्हिलर गाडयांना दंड करणारी वाहतूक शाखा मोठ्या वाहनांना दंड का करत नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.