लोकसभा निवडणूक मतमोजणीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज

0
60

नगर – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. ३७ अहमदनगर व ३८ शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी मतमोजणी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, एमआयडीसी, नागापूर, अहमदनगर येथे सकाळी ८ वाजेपासून सुरू होणार आहे. या मतमोजणीसाठी सुमारे एक हजार पाचशे अधिकारी,कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असुन मतमोजणीसाठी सर्व निवडणूक यंत्रणा सज्ज असल्याची माहिती निवडणूक शाखेने दिली आहे. मतमोजणीसाठी निवडणूक शाखेने सर्व यंत्रणा सज्जता केली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ हे स्वतः सर्व व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत. ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र. १ येथे तर ३८ शिर्डी लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी गोदाम क्र.३ मध्ये होणार आहे.

एका विधानसभा क्षेत्रासाठी १४ टेबल

३७-अहमदनगर लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा क्षेत्रांचा समावेश आहे. त्यात २२२-शेवगाव पाथर्डी, २२३-राहुरी, २२४-पारनेर, २२५-अहमदनगर शहर, २२६-श्रीगोंदा व २२७-कर्जत जामखेड असे सह विधानसभा मतदारसंघ आहेत. तसेच ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात २१६-अकोले, २१७-संगमनेर, २१८-शिर्डी, २१९-कोपरगाव, २२०-श्रीरामपुर व २२१-नेवासा असे एकुण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतांची मोजणी करण्यासाठी १४ टेबल लावण्यात आले आहेत.

मतमोजणी फेर्‍या

विधानसभा मतदार संघ निहाय असणार्‍या व मतदान केंद्रनिहाय होणार्‍या मतमोजणी फेर्‍या याप्रमाणे असतील. ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघातील २१६-अकोले, ३०७ मतदान केंद्र २२ फेर्‍या, २१७-संगमनेर २७८ मतदान केंद्र २० फेर्‍या, २१८-शिर्डी २७० मतदान केंद्र २० फेर्‍या, २१९-कोपरगाव २७२ मतदान केंद्र २० फेर्‍या, २२०-श्रीरामपुर ३११ मतदान केंद्र २३ फेर्‍या तर २२१- नेवासा २७० मतदान केंद्र २० फेर्‍या होणार आहेत. ३७-अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील २२२-शेवगाव पाथर्डी ३६५ मतदान केंद्र २७ फेर्‍या, २२३-राहुरी ३०७ मतदान केंद्र २२ फेर्‍या, २२४-पारनेर ३६५ मतदान केंद्र २७ फेर्‍या, २२५-अहमदनगर शहर २८८ मतदान केंद्र २१ फेर्‍या, २२६-श्रीगोंदा ३४५ मतदान केंद्र २५ फेर्‍या तर २२७-कर्जत जामखेड ३५६ मतदान केंद्र २६ फेर्‍या होणार आहेत.

सुरक्षा व्यवस्था

मतमोजणीसाठी नियुक्त प्रत्येक कर्मचारी, मतमोजणी प्रतिनिधी, निवडणूक प्रतिनिधी, उमेदवार यांना ओळखपत्र देण्यात आले आहेत. मतमोजणी केंद्राची कडक अशी सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. संपूर्ण मतमोजणी केंद्रावर सीसीटीव्हीद्वारे निगराणी होत आहे. मतमोजणी केंद्रात मोबाईल व पेन घेऊन जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या शिवाय स्वतंत्र मिडिया कक्ष स्थापन करण्यात आला असून त्याद्वारे माध्यम प्रतिनिधींपर्यंत माहिती पोहोचविली जाणार आहे.