बांगर पॉवर मॅक्स सिमेंट कंपनीच्या पाटस येथील प्लांटला व्हिजिट

0
12

नगर – दौंड रोडवर श्री बांगर पॉवर मॅस सिमेंट कंपनीचे लिंकर या कच्च्या मटेरियल पासून सिमेंट बनवणे याचे युनिट मागील दोन वर्षात चालू झाले आहे. असोसिएशनच्या सभासदांसाठी सिमेंट कसे बनवतात आणि त्यासाठी कोणकोणत्या टेस्ट लॅब मध्ये घेतात हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी बांगर पॉवर मॅस सिमेंटची फॅटरी एसा आणि बांगर पॉवर मॅस सिमेंट यांनी संयुक्त विद्यमाने आयोजित केली होती. संस्थेचे पन्नास सभासद या ट्रीप साठी पाटस येथे रवाना झाले होते. बांगर पॉवर मॅस सिमेंट कंपनीचे सी अँड एफ जितेंद्र मूनोत, रिजीनल हेड पंकज मुक्कावार, डेप्युटी मॅनेजर सुनिल वाघ व निलेश कवाष्टे, टेनिकल हेड ज्ञानेश भारती, टेनिकल ऑफिसर भरत शेंडे यांनी या स्टडी ट्रीपचे आयोजन केले तसेच अधिकृत विक्रेते पंकज मुनोत, सिद्धार्थ बंब, संजय लोढा, राहुल सोनीमंडलेचा, आनंद गुगळे, सुजित काकडे, अजिंय मुळे, वैभव शेटीया, प्रशांत कोळपकर, पुरुषोत्तम मानधने यांचे सहकार्य या सिमेंट प्लांट व्हीजीट साठी लाभले. यावेळी तेथील लॅब मधील विविध टेस्टची माहिती सिमेंट कंपनी अधिकारी यांनी दिली. मुक्कावार यांनी रेल्वे स्टेशन जवळ असल्याने बाहेरील राज्यातून येणारे लिंकर लगेच कंपनीला लागून असलेल्या रेल्वे लाईन वरून कंव्हेनर बेल्टने प्रोसेस साठी घेण्यात येते त्यामध्ये जिप्सम, फ्लाय अ‍ॅश आणि गरजेप्रमाणे इतर केमिकल मिस करण्यात येतात. फ्लाय अ‍ॅश बल्कर मध्ये स्टॉक करतात इम्पोर्टेड जिप्सम आणि केमिकल उच्च तापमानाला एकत्र करतात त्यावर ग्रायडिंग मिल मध्ये प्रक्रिया करतात आणि सिमेंट बनवले जाते.

यासाठी इंस्ट्रूमेंटल , फिजिकल आणि केमिकल टेस्ट घेतल्या जातात. ओ पी सी, पी पी सी आणि प्रिमिअम असे ब्रँड फ्लाय अ‍ॅ श आणि इतर केमिकल मिस करून बनवले जातात. येथे सिमेंट ग्रायंडिंग, पॅकिंग आणि ट्रान्सपोर्ट प्रोसेसिंग असे युनिट असून तीन हजार टन पर दिन सिमेंट निर्मिती क्षमता आहे. सिमेंट प्रकल्प अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून बनवला असून आपल्या शहरात अतिशय फ्रेश आणि हुक न लागलेले ताजे सिमेंट या प्रकल्पातून तीन तासात उपलब्ध होऊ शकते असे जितेन्द्र मुनोत यांनी सांगितले. संस्था अध्यक्ष रमेश कार्ले यांनी अश्या व्हिजीट च्या माध्यमातून सभासदांना सिमेंट निर्मिती कशी होते याचे प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाल्याचे नमूद करून अश्या माध्यमातून सभासदांच्या ज्ञानात भर पडते आणि प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून साक्षरता जोपासली जाते. यावेळी संस्थेचे श्याम गुलाटी, रमेश कार्ले, प्रदिप तांदळे, अन्वर शेख, रवी माने, सचिन डागा, अनमोल जैन, इबाल सय्यद, विकार काझी, शिरीष कुलकर्णी, अभिजित शिंदे, यश शहा, सुनिल औटी, संजय चांडवले आणि सभासद उपस्थित होते.