नगरमधून १२ वर्षाच्या मुलीचे अज्ञात व्यक्तीने केले अपहरण

0
55

नगर – नगर शहरातील सिद्धार्थनगर परिसरात राहणार्‍या एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अज्ञात व्यक्तीने अपहरण करत तिला राहत्या घरातून पळवून नेल्याची घटना मंगळवारी (दि.२८) दुपारी घडली आहे. याबाबत पिडीत मुलीच्या रात्री उशिरा तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या एका खाजगी हॉस्पिटल मध्ये काम करतात. त्या मंगळवारी कामावर गेलेल्या होत्या. त्यावेळी त्यांची अल्पवयीन मुलगी घरी एकटीच होती. त्या दुपारी घरी परतल्या असता त्यांना मुलगी घरात आढळून आली नाही. त्यांनी तिचा आजूबाजूला सर्वत्र शोध घेतला. मैत्रिणी, नातेवाईक यांच्याकडे चौकशी केली. मात्र तिचा कुठेही शोध न लागल्यामुळे तिला अज्ञात व्यक्तीने तिचे अपहरण केले असावे अशी शयता व्यक्त करत त्यांनी रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात इसमाविरुद्ध भा.दं.वि. कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.