शुक्लेश्वर अमरधाममध्ये पत्राशेडची उभारणी करावी

0
40

नगर – भिंगार येथील शुलेश्वर अमरधाम येथे दशक्रिया विधीच्या ठिकाणी अचानक पाऊस आल्यावर विधी करताना तारंबळ होत असते म्हणून या ठिकाणी पत्राशेड उभारल्यास पाऊस पाण्याच्या काळात कोणतेही अडचण येणार नाही तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन या ठिकाणी लवकरात लवकर पत्रा शेड उभारण्याची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्यावतीने अच्युत गाडे यांनी कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.