‘आनंदऋषीजी’मधील सूक्ष्म व्यायामाद्वारे मोफत मणके विकार उपचारांचा रूग्णांना लाभ

0
29

कंबरदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी, खांदेदुखीवर विनाऔषध परिणामकारक उपचार

नगर – विविध कारणांमुळेे अनेकांना पाठीचे, मणयांचे विकार जडत असतात. अशा मणके विकारांवर राष्ट्रसंत आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील आनंदऋषीजी ब्लड बँकेच्या तळमजल्यावर सूक्ष्म व्यायाम पद्धतीव्दारे मोफत उपचारांची कायमस्वरुपी व्यवस्था कार्यान्वीत आहे. याठिकाणी दररोज सकाळी १० ते ११ यावेळेत सूक्ष्म व्यायाम पध्दती उपचार तज्ज्ञ प्रसाद जोशी मार्गदर्शन करीत असतात. सहा वर्षात आतापर्यंत शेकडो रूग्णांना या उपचारांनी आराम मिळाला आहे. स्व.पानाबाई लक्ष्मीचंद रूणवाल (विजापूर, कर्नाटक) यांच्या सहकार्याने ही सेवा सुरु आहे. यात मणयात गॅप पडणे, गादी सरकणे, कंबरदुखी, पाठदुखी, मानेचे दुखणे, गुडघेदुखी आदी विकारांनी त्रस्त रूग्णांना व्यायामाच्या साध्यासोप्या आणि तितयाच परिणामकारक पध्दती शिकवल्या जातात. यातून रूग्णांना हमखास गुण येत असून अनेकांनी तशा प्रतिक्रियाही दिल्या आहेत. सतत मुंग्या येणे, पूर्ण पाय दुखणे, मान अवघडणे, हात पायाला बधिरता येणे आदी लक्षणांवर ही सूक्ष्म व्यायाम पद्धती परिणामकारक आहे. प्रताप राम भोजने यांनी सांगितले की, मला अचानक कंबर आणि पाय दुखण्याचा त्रास सुरू झाला. त्रास इतका वाढला की मला चालताना कोणाची तरी मदत घ्यावी लागत होती. एकाने मला जोशी सरांच्या उपचार पद्धतीची माहिती दिली. मी जोशी सरांशी संपर्क साधला. त्यांच्या सूचनेनुसार व्यायाम सुरू केला आणि अवघ्या तीन दिवसात मला फरक जाणवला. आता मी पूर्ण बरा आहे. सूक्ष्म व्यायाम उपचार पद्धती खूप लाभदायी आहे.

केशव शिंदे सांगतात, मी व माझ्या पत्नीने या सूक्ष्म व्यायाम पद्धतीने आजारापासून कायमचे मुक्त होण्याचा निर्धार केला. सातत्यपूर्ण व्यायाम करून मी आता पूर्ण बरा झालो आहे. माझी पत्नी कौशल्या आता नियमित व्यायाम करून बरी होण्याचा प्रयत्न करीत आहे. गुंजन विनोद भंडारी यांनी सांगितले की, मला कंबर दुखीचा खूप त्रास होता. जोशी सरांनी अतिशय सहज व सोप्या पद्धतीचे व्यायाम सांगून करवून घेतले. मला खूप फरक पडला आता कंबरदुखी जवळपास बंद आहे. नगर येथील अमृतलाल चंदूलाल कोठारी यांनी सांगितले की, मला खूप दिवसांपासून मान दुखण्याचा त्रास होता. मला संतोष बोथरा यांनी जोशी सरांकडे जायला सांगितले. त्यांनी सांगितल्याप्रमाणे घरीच मानेचे व्यायाम सुरू केले. आता मानेला खूप फरक पडला आहे. मी आजही नियमित व्यायाम करतो. घोडेगाव (नेवासा) येथील सोपान सिताराम बर्‍हाटे यांनी सांगितले की, माझ्या एका पायाला नेहमी मुंग्या येत होत्या. दोन महिन्यांपासून मला उभेही राहता येत नव्हते. मला जोशी सरांची माहिती मिळाली. त्यांच्या सल्ल्यानुसार मी व्यायाम सुरू केला. पाच दिवसातच मला २० टक्के फरक पडला. आता मी सर सांगतिल तो व्यायाम नियमित करून पूर्ण बरा होणार आहे. अधिक माहितीसाठी संपर्क ९९२१२७२३०६. येताना जुने रिपोर्ट सोबत घेऊन येणे तसेच नाव नोंदणी आवश्यक आहे.