दिव्यदृष्टी दिव्यांग संस्थेस कार्यालयासाठी जागा द्यावी

0
18

योगीराज गाडे यांचे महापालिका आयुक्तांना पत्र

नगर – दिव्य दृष्टि दिव्यांग विकास व संशोधन संस्था अहमदनगरसाठी कार्यालयीन जागा उपलब्ध करुन द्यावी अशी मागणी माजी नगरसेवक योगीराज गाडे यांनी महापालिका आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. या पत्रात म्हटले आहे की, दिव्य दृष्टि दिव्यांग विकास व संशोधन संस्था अहमदनगर ही संस्था दृष्टिहीन व्यक्तींसाठी कार्यरत आहे व त्यांच्या कल्याणासाठी विविध उपक्रम राबविते. या संस्थेला कार्यालयीन जागेची अत्यंत आवश्यकता आहे, ज्यामुळे ते आपल्या कार्यात अधिक परिणामकारक होऊ शकतील. बॉम्बे प्रांतिक नगरपालिका अधिनियम, १९४९ (इझचउ अलीं, १९४९) च्या कलम ६६ नुसार, नगरपालिकेला जनहितार्थ उपक्रम राबविण्याचा अधिकार आहे, ज्यामध्ये अशा संस्थांना कार्यालयीन जागा वाटप करणे शय आहे. संस्थेची उद्दिष्टे व कार्य महत्त्वाचे असल्यामुळे आपण त्यांना आवश्यक ती कार्यालयीन जागा वाटप करावी. आपल्या निर्णयाने दृष्टिहीन व्यक्तींच्या विकासासाठी मोठे योगदान होईल व अहमदनगर शहराच्या सामाजिक विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असे गाडे यांनी म्हटले आहे.