रिक्षा चालकावरील भ्याड हल्ल्याचा लोकराज्य संघटनेच्यावतीने निषेध

0
15

नगर – रिक्षा चालक गणेश आटोळे यांना मारहाण केल्याप्रकरणी आरोपी जावेद शेख व अय्याज शेख यांच्यावर जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी कठोर कारवाई करावी. तसेच लकी हॉटेल समोरील दोन रिक्षा चालकात वाद होऊन रिक्षा चालक गणेश आटोळे हा फॅचर झालेला असून संबंधितावर भा.दं.वि. कलम ३०७ गुन्हा दाखल करण्यात यावा. या मागणीचे निवेदन लोकराज्य ऑटो व टॅसी चालक मालक संघटनाच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले. याप्रसंगी संघटनेच्या संस्थापक अध्यक्ष रामराजे शिंदे, जिल्हाध्यक्ष सिताराम खाकाळ, नगर शहर जिल्हा सरचिटणीस शंकर गोरे, जिल्हा कार्याध्यक्ष दिपक गुंजाळ, शहराध्यक्ष सुनिल ठाकरे, सह. सरचिटणीस मच्छिंद्र शिंदे आदी उपस्थित होते. अशा प्रकारामुळे अ‍ॅटो चालक मालक संघटनेची बदनामी होत आहे. प्रवासी व स्थानिक नागरकांत वेगळ्या दृष्टीने पाहत असून रिक्षात बसावे की नाही. प्रवाशांना हा संभ्रम निर्माण होत आहे. सदर घटना रिक्षा लावण्यावरून झाली असून तेथे ट्राफिकचा एक पोलिस कर्मचारी कायमस्वरूपी नेमण्यात यावा, अशी मागणी संघटनेने केली आहे.

पुढील काळात अशी घटना कोणत्याही रिक्षा प्रवासी स्टॉपवर घडता कामा नये. याची सर्व रिक्षा अ‍ॅटो चालक व मालकाने तसेच संघटनेने दक्षता बाळगावी. जावेद शेख व अय्याज शेख हे ‘तु कसा धंदा करतो ते मी पाहतो.’ त्यांच्या अशा दादागिरीमुळे स्टँडवर पॅसेंजरच्या व जनतेच्या आणि रिक्षावाल्यांच्या मनात एक भिती निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे रिक्षावाल्यांचा उदरनिर्वाह खंडीत झाला आहे. त्यामुळे गणेश आटोळे व असंख्य रिक्षा वाल्यांवर जो अन्याय होत आहे तो अन्याय बंद करण्यात यावा फिर्यादी गणेश आटोळे यांना न्याय मिळवून द्यावा. इथून पुढे जर माळीवाडा स्टँडवर किंवा याच्या व्यतिरिक्त रिक्षावाल्याच्या जिवीतास धोका झाला तर आरोपी आणि समर्थक जबाबदार राहतील. याची प्रशासनाने नोंद घ्यावी. आरोपीवर कठोर कारवाई करावी. यापुढील काळात रिक्षा चालकावर अन्याय झाल्यास लोकराज्य ऑटो व टॅसी चालक मालक संघटनाच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.