मालकी हक्काच्या जमिनीवर बांधकाम करण्यास अडथळा आणणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी

0
29

बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, जागामालक पवनकुमार अग्रवाल यांची पोलिसांकडे मागणी 

नगर – सावेडी, पाईपलाईन रोड येथे सर्व्हे नंबर २५/१अ, २५/१ब, २५/१क, २५/१ड अशी एकूण १०५ गुंठे जागा आहे. सदर जागा श्रीमती वेणुबाई विठ्ठल वाणी व शंकर भाऊ वाणी यांनी आम्हाला ७/१२/१९९२ रोजी विकली होती. त्यानंतर श्रीमती वेणुबाई वाणी यांनी कोर्टात आमच्यावर वेगवेगळे दावे केले होते. न्यायालय अहमदनगर यांनी सदर दावे फेटाळून लावलेले आहेत. सदर दावेदार श्रीमती वाणी या कोर्टाचा आदेश होऊनसुद्धा जागेवर बेकायदेशीर कब्जा करून आहेत. आमच्या मालकीच्या जागेवर वॉलकंपाऊंड करण्यास पोलिस संरक्षण द्यावे तसेच आमची बदनामी करणार्‍यांवर गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी पोलिस अधीक्षकांकडे करण्यात आल्याची माहिती पवनकुमार अग्रवाल व गंगाराम हिरानंदानी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासंदर्भात दिलेल्या निवेदनात पवनकुमार अग्रवाल यांनी म्हटले आहे की, सावेडी येथील पाईपलाईन रोड वाणी नगर परीसरातील सर्व्हे नंबर २५/१ब व २५/१ड या मिळकती शंकर भाऊ वाणी यांचेकडून ०७ डिसेंबर १९९२ मध्ये खरेदीखताने माझी आई लिलावती नंदकिशोर अग्रवाल हिचे नावे खरेदी केलेली होती व त्याप्रमाणे मिळकतीचे महसुल दप्तरी नोंद झालेली होती दरम्यान माझी आई मयत झाल्यानंतर सदर मिळकतीस माझी व पवनकुमार नंदकिशोर अग्रवाल, हेमलता प्रकाश अग्रवाल, शिवप्यारी प्रमोद अग्रवाल, किरण, प्रदिपकुमार अग्रवाल, आनंद प्रदिपकुमार अग्रवाल अपाक किरण, स्नेहा प्रदिपकुमार अग्रवाल अपाक किरण, राजलक्ष्मी प्रदिपकुमार अग्रवाल अपाक किरण यांच्या नावाची वारसा हक्काने फेरफार क्रमांक २५४५८ अन्वये नोंद झालेली आहे. सदर मिळकतीशी गैरअर्जदार यांचा कोणताही संबंध नसताना देखील त्यांनी अहमदनगर येथील दिवाणी न्यायालयात खोट्या मजकुरचा दावा रे. मु. नंबर २९०/२०२४ चा दावा मनाई हुकुम व कब्जासाठी दाखल केलेला असून त्यामध्ये आम्ही हजर झालेलो आहोत. सदरच्या दाव्यात कोणताही मनाई हुकुमाचा आदेश झालेला नाही. सदर दाव्यात गैरअर्जदार यांनी नि.२५, ३० अन्वये दिलेल्या अर्जावरही कोणताही आदेश झालेला नाही. आमच्या विरुध्द कोणताही आदेश झालेला नाही.

दरम्यानच्या काळात सदर मिळकतीची पोलीस संरक्षणात मोजणी होवून हद्दी खुणा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे मिळकतीस वॉल कंपौंडचे काम करण्यासाठी आम्ही २२ मे रोजी मजुरांसमवेत मिळकतीमध्ये गेलो असता, गैरअर्जदार यांनी आपणांकडे आमच्या विरुध्द खोट्यानाट्या मजकुराचा अर्ज करुन, प्रसारमाध्यमाकडेही खोट्यानाट्या बातम्या आमच्या विरुध्द प्रसिध्द करुन आम्हास वॉल कंपौंडचे काम करण्यास हरकत केलेली आहे. वास्तविक पाहता सदरची मिळकत ही मुळची शंकर भाऊ वाणी यांना रे मु नंबर २२८/१९८८ मध्ये झालेल्या कोर्ट वाटपाने मिळालेली असून, सदर मिळकतीशी गैरअर्जदारांचा काहीएक संबंध नव्हता व नाही. सदरची मिळकत आम्ही रजि. खरेदीखताने विकत घेतलेली असल्याने, सदर मिळकतीशी गैरअर्जदारांचा काहीएक संबंध नसल्याने, तिने सदर खरेदीखताबाबत अद्याप कोठेही तक्रार केलेली नाही, अगर कोणत्याही न्यायालयात सदरचे खरेदीखत आव्हानीत केलेले नाही, किंवा सदरचे खरेदीखत अद्याप कोणत्याही न्यायालयाने रद्दबादल केलेले नाही. परंतु गैरअर्जदार नंबर १ ही कोर्टबर्ड महिला असून, त्यांचेकडे मनुष्यबळ असल्याचा गैरफायदा घेवून, सदरची महिला अनाधिकाराने व बेकायदेशिरपणे आम्हांस हरकत अडथळा करुन, आमचे विरुध्द खोट्या बातम्या प्रसिध्द करीत आहे. सदरची महिला व तिचे कुटुंबिय अतिशय आडदांड व नंगड प्रवृत्तीचे असून, सदरच्या महिलेने आमचेवर केलेल्या दाव्याप्रमाणेच इतर अनेक लोकांवर वेगवेगळे खोटे दावे, तक्रारी केलेल्या आहेत.

सदरची महिला आडदांडपणाने व आडमुठेपणाने वागून आम्हास विनाकारण त्रास देत आहे. आम्ही व्यापारी समाजातील असून आम्हांस येनकेनप्रकारे त्रास देवून आमची समाजात, नातेवाईकांत बदनामी करुन, आमचे खरेदी मालकीची मिळकत फुकटात हडप करण्याचा कुटील प्रयत्न करीत आहे. सदर गैरअर्जदारांचे कृत्य चुकीचे, बेकायदेशिर असे असून आमचेवर अन्याय करणारे आहे. सदरच्या गैरअर्जदारांना समजावून सांगूनही ते कोणाचेही काहीही ऐकत नाही उलट सदरचे गैरअर्जदार महिला असल्याचा गैरफायदा घेवून कलम १३५४ सारख्या खोट्या केसेस करण्याच्याही धमया देत आहेत. सदर गैरअर्जदार यांच्या मालकीच्या असलेल्या इतर मिळकतीस आम्ही कधीही कोणत्याही प्रकारची हरकत अडथळा केलेला नाही व करत नाही परंतु केवळ आम्हांस आमच्या खरेदी मालकीचे मिळकतीचा सुखे उपभोग घेण्यास गैरअर्जदारच कायदा हातात घेवून अडथळे निर्माण करीत आहे व आमच्या विरुध्द खोट्या केसेस, दावे करुन, आमच्यावर दहशत निर्माण करीत आहेत. यामध्ये समीर काळे, विशाल पवार व त्यांची ८ ते १० जणांची टोळी आम्ही ज्या ज्या वेळेस तेथे मोजणीसाठी जातो त्या त्या वेळेस आम्हाला अडवणुक करुन कामास अडथळा आणतात व पैशाची मागणी करतात. तरी गैरअर्जदार यांनी आपणाकडे आमच्या विरुध्द दिलेल्या खोट्या अर्जासंदर्भात व प्रसारमाध्याद्वारे आमची केलेली व करीत असलेल्या बदनामी संदर्भात गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी. आमच्या खरेदी मालकीचे मिळकतीमध्ये झालेल्या मोजणीप्रमाणे वॉलकंपाऊंड करण्यास पोलिस संरक्षण देण्याची मागणी अग्रवाल यांनी केली आहे.