नालेगाव अमरधाम येथे बेकायदेशीर वृक्षतोड

0
75

नगर – मानवी जीवनामध्ये वृक्षाला खूप मोठे महत्त्व असून प्रत्येकाने वृक्षाचे जतन करणे गरजेचे आहे. मात्र या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत उभे असलेली झाडे तोडण्याचे काम केले जात आहे. ही बाब गंभीर आहे. सध्या आपण सर्वजण उष्णतेची समस्या अनुभवत आहोत ही समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. यासाठी पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाची खरी गरज असताना देखील महापालिकेच्या माध्यमातून नालेगाव अमरधाम येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारला जात आहे. मात्र ठेकेदार एजन्सी कडून अनेक वर्षाचे झाड बेकायदेशीरपणे तोडले आहे. उभे असलेल्या झाडाचे जतन होण्यापेक्षा तोडण्याचे काम अधिक केले जाते. तरी ठेकेदार एजन्सीवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा यांनी महापालिकेकडे केली आहे.