श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानने १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी केली मोफत निकालाची व्यवस्था

0
51

निकाल पाहून मुलांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद : संदिप दातरंगे

नगर – इ. १२ वी विद्यार्थ्यांचा निकाल पाहून त्यांना छायांकित प्रत श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने देण्यात आली. याप्रसंगी माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदिप दातरंगे, सचिन शिंदे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, सनी आगरकर, गणेश दातरंगे, शुभम दातरंगे, रोहित लोखंडे आदिंसह विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांना पेढे भरुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी संदिप दातरंगे म्हणाले, इ.१० वी आणि इ. १२ वी ही विद्यार्थ्यांबरोबरच पालकांची परिक्षा असते. या परिक्षेचा निकाल काय लागतो, याची सर्वांनाच उत्सुकता असते. बोर्डाने जाहीर केल्यानंतर या विद्यार्थ्यांना मोफत निकाल पाहून त्याची छायांकित प्रत देण्याचा उपक्रम श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने राबविण्यात आला.

या सुविधांचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी गर्दी केली होती. निकाल पाहून मुलांच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद दिसून येत होता. मुलांनी मिळविलेल्या गुणवत्तेनुसार आपल्या जीवनाची पुढील दिशा ठरावी व यशस्वी व्हावे, अशा शुभेच्छा दिल्या. त्याचप्रमाणे लवकरच या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुण-गौरव समारंभ आयोजित केला जाईल, असे सांगितले. याप्रसंगी संजय शेंडगे यांनी श्री स्वामी समर्थ प्रतिष्ठानच्यावतीने १२वी मुलांना निकाल पाहण्याची चांगली सोय उपलब्ध केली. प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेहमीच समाजाभिमुख उपक्रम राबविले जात असतात. प्रतिष्ठानचे कार्य सर्वांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहील आहे.