वडगांव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्यालयातील विद्यार्थी पुन्हा २५ वर्षांनंतर रमले शाळेत

0
29

नगर – वडगांव गुप्ता येथील ज्ञानसरिता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील १९९९ च्या इ. १० वी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेह मेळावा नुकतेच झाला. यावेळी माजी विद्यार्थी, त्यावेळचे शिक्षक उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहसंमेलनात उपस्थित राहण्याचा क्षण हा शिक्षकांसाठी मोठा आनंदाचा असतो. २५ वर्षांनंतर पुन्हा विद्यार्थ्यांची व शिक्षकांची भेट झाल्याने वातावरण भावूक झाले होते. आज या माजी विद्यार्थ्यांमधील काही सरकारी नोकरीत, काही कंपनीत उच्चस्थ पदावर कार्यरत आहेत. या मेळाव्यास बाळासाहेब कळमकर, संतोष दिवटे, लहु टकले, नितीन ठुबे, ओम महाराज साळुंके, प्रिया शेवाळे आदिंसह बहुसंख्य माजी विद्यार्थी तसेच डोंगरे सर, ठाणगे सर, शिंदे सर, धनगर सर, सातपुते सर, अकोलकर सर, कानडे सर, पळसकर सर, सुंबे सर, श्रीमती रक्ताटे, श्रीमती माने, श्रीमती घाटे, श्रीमती वाघ आदि शिक्षकवृंद उपस्थित होते. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगतातून २५ वर्षांपुर्वीच्या आठवणींना उजाळा दिला.

त्यावेळेसचे अनुभव कथन करतांना अनेक विद्यार्थ्यांच्या भावना दाटून आल्या. यानंतर विद्यार्थी पुर्वीच्या वर्गात जाऊन बसले. शिक्षकांनही त्यावेळचे काही किस्से आणि आठवणी सांगितल्या. यावेळी माजी विद्यार्थ्यांच्यावतीने विद्यालयास डिजिटल लास रुमसाठी इंटर अ‍ॅटीव्ह व्हाईट बोर्ड भेट देण्यात आला. तसेच गुरुजनांचा आंब्याची रोप देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या स्नेह मेळाव्यास उपस्थित राहण्याचा मोठा आनंद असतो, असे सांगितले. ज्ञानेश्वर आजबे यांनी सूत्रसंचालन केले.