साईटवरून सव्वातीन लाखांच्या बांधकामाच्या साहित्याची चोरी

0
18

नगर – नवीन इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने त्या ठिकाणी ठेवलेल्या सुमारे ३ लाख २७ हजार रुपये किमतीच्या इलेट्रिक साहित्याची अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची घटना बालिकाश्रम रोडवरील फुलारी मळा येथील साई कॉलनीत रविवारी (दि.१९) सायंकाळी ५.३० ते सोमवारी (दि.२०) सकाळी ६.३० या कालावधीत घडली. याबाबत चेतन पोपटलाल भळगट (रा. फुलारी मळा, बालिकाश्रम रोड) यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी भळगट यांच्या नवीन घराचे बांधकाम फुलारी मळा येथील साई कॉलनीत सुरु आहे. त्यासाठी त्यांनी लाईट फिटिंगची वायर, ३ एसी, कटर मशीन, ड्रील मशीन असे विविध साहित्य तेथे ठेवलेले होते. अज्ञात चोरट्यांनी त्यातील सुमारे ३ लाख २७ हजार रुपये किमतीचे साहित्य चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादी वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भा.दं. वि. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.