मतदान करतानाचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल

0
48

नगर – लोकसभा निवडणुकीत मतदान करतानाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये काढून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरूध्द भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम १८८, लोकप्रतिनिधी अधिनियम कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा परिषद शाळा दरेवाडी (ता. नगर) येथील मतदान केंद्रावर ही घटना घडली. केंद्राध्यक्ष रवींद्र किसन चोभे (वय ४६ रा. दळवी मळा, गुलमोहोर रस्ता, सावेडी) यांनी फिर्याद दिली आहे.

नगरजवळील दरेवाडी येथील प्रकार; एका जणावर गुन्हा दाखल 

ते इतर सहकार्‍यांसह १३ मे रोजी लोकसभा निवडणुक मतदानाच्या दिवशी दरेवाडी येथील शाळेत केंद्राध्यक्ष म्हणून ड्यूटीवर असताना अज्ञात व्यक्तीने मतदान करतानाचा चोरून व्हिडीओ लिप काढून ती इंस्टाग्राम अकाऊंटवर व्हायरल केली आहे. याबाबत गुन्हा दाखल करण्याचे आदेश सहा. निवडणूक निर्णय अधिकारी शाहुराज मोरे यांनी दिल्यानंतर चोभे यांनी शनिवारी (दि.१८) भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.