सदगुरू शंकर महाराज हे दत्तप्रभूंचे ७ वे अवतार

0
61

नगर – दत्तप्रभूंचे सप्तरूपी स्वरूप आहे यामध्ये प्रथम दत्तप्रभू, दुसरे बालस्वरूप, तिसरे नुरसिंह, चवथे गजानन महाराज, पाचवे स्वामी समर्थ, सहावे साईबाबा व सातवे शंकर महाराज आहेत यातील ४ स्वरूप हे अवलिया आहेत असे प्रतिपादन स्वामी विश्वेश्वर महाराज यांनी केले. एमआयडीसीच्या मंगल दत्त क्षेत्रात सद्गुरू श्री शंकर महाराज समाधी सोहळा मोठ्या उत्साहात झाला. त्यावेळी ते प्रवचनात बोलत होते. ते पुढे म्हणाले शंकर महाराज म्हणत कि रिद्धी सिद्धीच्या मागे धावू नका कर्म कांड करू नका, कर्म योग्य प्रकारे करा, वाणीचा योग्य वापर करा, आपण कोणत्या भावनेने कर्म करतो हे महत्वाचे आहे कोणत्या दिशेने विचार करतो, काय खातो, काय पितो यातील भाव महत्वाचा आहे या भावावर भूतकाळाचा प्रत्येक काळाचा पाया हा वर्तमान काळातील अवस्था दाखवितो या दत्तक्षेत्रांत दर गुरुवारी भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते, मानवाला मनशांती मंदिरात गेल्यावर मिळते म्हणून मानव मंदिरात येतो सगळं काही योग्य पद्धतीने मिळवून देण्याचं सामर्थ्य दत्तप्रभूंच्या दरबार मध्ये आहे आपल्या येथे कुठलीही दोरी बांधलेली नाही, कुठलेही काही नियम नाहीत म्हणून दर्शन घ्यायला आडकाठी नाही, आपले हे स्थान ४० वर्षपूर्वीचे आहे तेव्हापासून भाविक येथे दर्शनाला भाविक येत आहेत असेही ते म्हणाले. यावेळी भाविक उपस्थित होते.