दुर्गाष्टमी, बुधाष्टमी, शके १९४६ क्रोधीनामसंवत्सर, वैशाख शुलपक्ष, आश्लेषा
१५|२५ सूर्योदय ०६ वा. २५ मि. सूर्यास्त ०६ वा. २९ मि.
राशिभविष्य
मेष : आपण आपल्या घराच्या वाढीबाबत काही योजना बनवू शकता. व्यापार्यांसाठी
परिस्थिती साधारण. जोडीदाराशी वादविवाद टाळा. राजकीय व्यक्तींसाठी देखील स्थिती
सुखदायक राहील. आपण सहजरित्या नवीन आव्हाने पेलता.
वृषभ : आपणास काही अधिक जबाबदार्या मिळण्याची शयता आहे. आनंदाची
बातमी मिळेल. यथायोग्य विचार करून कार्य करा अडचणी येण्याची शयता आहे. विशिष्ट
कार्य पूर्ण होतील. महत्वपूर्ण व्यक्तींशी संपर्क सुखाचे राहील.
मिथुन : आजचा दिवस आपल्यासाठी नवी सुरुवात करण्यास उपयुत ठरेल. शत्रू
वर्गापासून दूर राहा. आपली योजना बनवण्यात सावधगिरी बाळगा. दिवस अनुकूल व महत्वाचा
असेल. आपले अडकेलेले कार्ये पूर्ण होतील. व्यापार-व्यवसायात स्थिती सुखद राहील.
कर्क : व्यक्तीमत्वाचे ध्येय ठरावण्यास साहाय्यक असू शकतो. प्रेमीजनांसाठी आजचा
दिवस आनंदाने परिपूर्ण असेल. आपल्या कार्यातील अडचणी दूर होतील. अधिकार्यांकडून
कामे करवू शकाल. नोकरीपेशा व्यतींसाठी पगारवाढीचे योग आहेत. आज आपणास
एकांताचा लाभ होईल.
सिंह : बळात वाढ होईल. आरोग्य उत्तम राहील. महत्त्वाच्या कामांसाठी श्रम करावे
लागेल. व्यापार-व्यवसायासाठी आज दिवस उत्तम राहील. आरोग्य देखील उत्तम राहील.
नोकरदार व्यक्तींसाठी वातावरण अनुकूल राहील.
कन्या : सुख-शांतीचे वातावरण राहील. व्यापार-व्यवसाय सहज राहील. कौटुंबिक
सभासदांचा सहयोग मिळेल. अपत्यांचा सहयोग मिळेल. आरोग्य उत्तम राहील. कोणताही अर्ज
देण्यासाठी उत्तम वेळ.
तूळ ; व्यापार व प्रणयाच्या क्षेत्रात यश मिळेल. प्रिय व्यक्तीबरोबर संवाद होईल. एखाद्या
मित्राचे सहकार्य मिळेल. कौटुंबिक वातावरण आनंददायक राहील. श्रम अधिक झाल्यामुळे
दमल्यासारखे वाटेल.
वृश्चिक : आवश्यक कार्य देखील पूर्ण होतील. मित्रांचा अनुकूल सहयोग मिळेल.
आरोग्य देखील उत्तम राहील. कौटुंबिक सहयोग मिळेल. शत्रूवर्ग निष्प्रभावी राहील. एखादे काम
न झाल्यामुळे अप्रसन्न राहाल.
धनु : आयुष्यात आपल्या नातलगांची व मित्रांची चांगली भूमिका रहाणे शय आहे.
आपल्या प्रयत्नांमध्ये इतर लोकांची मदत घेतल्याने आपले कार्य किंचित सोपे होईल.
आरोग्य चांगले राहील.
मकर : आपल्या व्यावसायिक योजनेबद्दल होकारात्मक दृष्टीकोन प्रदर्शित होईल. वाहने
काळजीपूर्वक चालवा. संतोषजनक स्थितीमुळे उत्साह वाढेल. प्रेयसीशी संपर्क होण्याची
शयता आहे.
कुंभ : नवीन जोखिम असलेली कार्ये टाळाल. दिवस आनंदात जाईल. आजचा
दिवस व्यापार क्षेत्रातील चांगली बातमी आणेल. मनोरंजनावर खर्च होईल. आरोग्य उत्तम राहील.
आरोग्याच्या दृष्टीने उत्तम वेळ आहे. महत्वपूर्ण कार्ये योग्य वेळी होतील.
मीन : कार्याच्या दरम्यान आपल्या कौटुंबिक ताणांचे स्मरण करून त्यांना कार्यात
मिसळू द्याल. व्यापारासाठी प्रवासाचे योग संभवतात. वैवाहिक जीवनाच्या आनंदात वाढ
होईल. लेखन कार्यात यश मिळेल.
संकलक : अॅड. सौ. पूजा गुंदेचा, नगर