नरेंद्र मोदींचा विजयाचा रथ थांबवणे आता शक्य नाही : मंत्री रामदास आठवले

0
20

केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले; महायुतीचे उमेदवार सुजय विखेच्या प्रचारार्थ मंगलगेट येथे सभा; मला नको आहे तुमचा फुलांचा बुके… मला हवा आहे नगरचा खासदार म्हणून सुजय विखे…

नगर – लोकशाहीत प्रत्येक मताला खूप महत्व आहे. त्यामुळे प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजवावा. या लोकशाहीला कोणी धक्का लावला तर त्याची वाट लागेल असा धक्का आम्ही लावू. बाबासाहेबांनी देशाला दिलेले संविधान बदलण्याचा कोणताही विचार भाजपाचा व महायुतीचा नाहीये. संविधान बदलायचा अपप्रचार करून विरोधक जनतेची दिशाभूल करत आहेत. ७० वर्षात काँग्रेसने दलितांच्या मतनाचा केवळ वापर केला. पण दलितांसाठी काहीही केले नाही. काँग्रेसनेच बाबासाहेबांचा अनेकदा अपमान करून त्यांना मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास प्रवृत्त केले होते. बुद्धांचे पूजक असलेल्या मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने डॉ.बाबासाहेब अंबेडकरांचा फोटो संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये लावला, लंडन मधील बाबासाहेबांचे घर ताब्यात घेतले, इंदु मिलची जागा बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दिल्याने तेथे दोन वर्षात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी गैरसमज करून घेवू नये. बाबासाहेबांनी दिलेले संविधान मजबूत करण्याची शपथ मोदींनी घेतली आहे. या निवडणुकीत परदेशातून मोदींना मिळत असलेला प्रतिसाद पहाता नरेंद्र मोदींचा विजयाचा रथ एवढ्या ताकदीने पुढे चालला आहे की तो थांबवणे आता शय नाह. हा रथ जर कोणी अडवला तर त्याला आडवे केल्या शिवाय आम्ही रहाणार नाही, असे प्रतिपादन आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी करून नगर मधून महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांनाच दलित व सर्व समाजांनी मतदान करून विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले. अनिल शिंदे, ज्ञानेश्वर काळे, जीत आठवले आदींसह पदाधिकरी व नागरिक उपस्थित होते. यावेळी मंत्री आठवले यांनी भाषणामधून आपल्या महायुतीचे उमेदवार डॉ.सुजय विखे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत बोलताना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले. सचिन जाधव, सुनील साळवे, वसंत लोढा, अनिल शिंदे, ज्ञानेश्वर काळे, जीत आठवले आदींसह महायुतीचे पदाधिकरी. नेहमीच्या पद्धतीने चारोळ्या सादर करून विरोधकांवर निशाण साधला. ते म्हणाले, मला नको आहे तुमचा फुलांचा बुके… मला हवा आहे नगरचा खासदार म्हणून सुजय विखे यांच्या प्रचारार्थ मंत्री रामदास आठवले यांची शुक्रवारी सायंकाळी नगर मधील मंगलगेट येथे जाहीर सभा झाली. यावेळी माजी राज्यमंत्री राजकुमार बडोले, शिवसेनेचे प्रवक्ते राजू वाघमारे, संपर्क प्रमुख सचिन जाधव, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, भाजपाचे वसंत लोढा, शिवसेना जिल्हाप्रमुख सुजय विखे…, देशात आहे नरेंद्र मोदींची अंधी… मग मला का मिळणार नाही मंत्री पदाची संधी…, यहाँ बात हो रही है सबको डरानेकि… हमारा मिशन है काँग्रेस को हरानेकी…., माझ्या हातात नेहमीच असतो झेंडा निळा…. म्हणून विरोधकांच्या पोटात उठतो गोळा… या चारोळ्यांना उपस्थितांनी टाळ्या व शिट्ट्यांनी दाद दिली. यावेळी राजकुमार बडोले म्हणाले, भारतीय संविधानाचा मूलभूत ढाचा बदलण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. विरोधक याबाबत कांगावा करत दिशाभूल करत आहेत. भारतीय जनता पक्ष हा संविधानानुसार काम करणारा पक्ष आहे. राजू वाघमारे यांनी देशाच्या व दलित समाजच्या प्रगतीसाठी केंद्रात पुन्हा मोदी सरकारचीच आवश्यकता आहे. त्यामुळे नगरमधून सुजय विखेंना विजयी करा असे आवाहन केले. सुनील साळवे यांनी प्रास्ताविक केले. सचिन जाधव यांनी आभार मानले. यावेळी अश्विनी जाधव, किरण दाभाडे, विजय भांबळ, अजय साळवे, महेंद्र लोंढे, अमोल हुंबे, नितीन कसबेकर, अनिल गट्टानी, शिला खराडे, बंटी डापसे, रवी लालबोन्द्रे, सुनील उमाप, राहुल कांबळे, सुमित बटूळे, चंद्रकांत पाटोळे, विनोद भिंगारे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते