रस्त्याच्या मध्यभागी विद्युत खांबाच्या रूपात ‘यमदूत’

0
39
oplus_32

रस्ते रुंदीकरण आणि काँक्रिटीकरण करताना रस्त्यांच्यामध्ये येणार्‍या वीज खांबामुळे वाहतुकीला
अडथळा तर होतोच पण अपघाताला निमंत्रणही मिळते. अशा अनेक घटना शहरात घडल्या आहे. तरीही
ठोस पावले उचलली जात नाही. उलट खांब न काढताच रस्त्यावरील वाहतूक सुरू केली जाते. शहरातील
सावेडी उपनगरातील पारिजात चौक ते टेलिफोन ऑफिस ते नवीन जिल्हाधिकारी रोड/समतानगर रोड
वर धोकादायक अवस्थेत विद्युत खांब उभा आहे. अश्या प्रकारचे खांब हटण्याची जबाबदारी महापालिका
व महावितरण या दोघांची आहे त्यासाठी लागणारा खर्च दोघांनी उचलायचा आहे. पण अजूनही ही कामे
शहरात पूर्ण झालेली नाहीत महापालिका व महावितरण यांनी शहरातील धोकादायक अवस्थेत उभे
असणार्‍या विजेच्या खांबाचे सर्वेक्षण करून सदर खांब रस्त्याच्या कडेला स्थलांतरित करण्याची कार्यवाही
करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.