प्रत्येक मतदान केंद्रस्थळी वैद्यकीय मदत कक्ष स्थापन; शहरातील सात आरोग्य केंद्रात ॲम्ब्युलन्स उपलब्ध

0
22

नगर – लोकसभा निवडणुकीत २२५ अहमदनगर लोकसभा मतदार संघासाठी १३ मे रोजी मतदान होणार आहे. त्याअनुषंगाने मतदान पथकाला तसेच मतदान केंद्रामध्ये येणार्‍या नागरिकांना वैद्यकीय मदत पुरविणेसाठी प्रत्येक मतदान केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे तसेच सात नागरी आरोग्य केंद्राच्या ठिकाणी अ‍ॅम्ब्युलन्स उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अनिल बोरगे यांनी दिली आहे. वैद्यकीय अधिकारी, संपर्क क्रमांक ः महात्मा फुले नागरी आरोग्य केंद्र- डॉ. वृषाली आरु (८७७९०४४७७१), जिजामाता नागरी आरोग्य केंद्र – डॉ. आयेशा शेख (८०८७८३२११०), तोफखाना नागरी आरोग्य केंद्र – डॉ. आरती डापसे (८४१२८११५११), केडगाव नागरी आरोग्य केंद्र – डॉ. गिरीश दळवी (९४२१६०३१०१), मुकुंदनगर नागरी आरोग्य केंद्र – डॉ. नलिनी थोरात (७०८३४६५३६९), सिव्हील नागरी आरोग्य केंद्र – डॉ. शिल्पा चेलवा (९४२२०८५०६०), नागापूर नागरी आरोग्य केंद्र – डॉ. कविता माने (९५०३०३८८१०).