अहमदनगर मनपातर्फे मतदानासाठी बलूनद्वारे जनजागृती

0
34

नगर – लोकसभा निवडणुकीसाठी येत्या १३ मे रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार असून जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार ७५ टक्के मतदान घडवण्याचे मिशन पूर्ण करायचे असून त्यासाठी अहमदनगर मनपाच्या वतीने विविध उपक्रम राबवत नागरिकांमध्ये मतदानासाठी जनजागृती करण्यात आली, त्याचाच एक भाग म्हणून १३ मे रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी नगर शहरातील विविध भागात बलूनद्वारे मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. लोकशाहीचे मुल्य वृद्धिंगत करण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त मतदानाचा हक्क बजवावा यात नाव मतदार यांनी पुढे येवून राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी सर्वच मतदारांनी यात सहभाग नोंदवावा, नागरिकांमध्ये जास्तीत जास्त रुजवण्याचे काम करणार्‍याना पुरस्कार वितरीत करण्यात येणार आहे असे मत मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले. मतदानाच्या जनजागृतीसाठी अहमदनगर मनपाच्या वतीने प्रशासकीय इमारतीवर लावण्यात आलेल्या बलूनची आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी पाहणी केली.

७५ टक्के मतदान घडवण्याचे मिशन यशस्वी करू : आयुक्त डॉ. पंकज जावळे

यावेळी उपायुक्त साताळकर, उपायुक्त पवार, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे, उद्यान प्रमुख शशिकांत नजन, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते. मतदान नजागृतीसाठी शहरात गृहफेरी लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये मतदान ५० टक्केहून कमी झालेल्या नगर शहरातील १४ ठिकाणी गृहफेरी काढण्यात येत असून त्यासाठी ४२ कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे, ते दररोज या भागात नागरिकांच्या घरोघरी जाऊन नागरिकांमध्ये विविध उपक्रमातून जनजागृती करण्यात येत आहे व केलेल्या दैनदिन कामाचा अहवाल मागवला जात असून शहरात ७५ टक्के मतदान घडवण्याचे मिशन यशस्वी करू असे मत आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी व्यक्त केले. माय वोट माय राईट या संकल्पनेनुसार आज मी सोलापूर शहरात जावून लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला, प्रशासकीय जबाबदारी पार पडत असतानाच राष्ट्रीय मुलभूत कर्तव्य पार पाडले आणि पुन्हा प्रशासकीय जबाबदारीसाठी कर्तव्यावर हजर झालो, सर्व नागरिकांनी देखील वेळात वेळ काढत आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन अहमदनगर मनपाचे आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी केले.