रेरा कायदा हा ग्राहक आणि विकासक या दोघांच्या हिताचा

0
43

नगर – आर्किटेट इंजिनिअर्स अ‍ॅड सर्वेअर्स असो अहमदनगर, व पोलाद स्टील जालना, यांच्या संयुक्त विद्यमाने इंजि. प्रकाश जैन यांचे महारेरा अंतर्गत येणार्‍या अपार्टमेंट व सोसायटी मेंटेनन्स, रेरातील विविध बँक अकाउंट्स, आणि महारेरा मधील आर्किटेट, इंजिनिअर्स व सीए यांचे विविध फॉर्म्स विषयी व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. इंजि प्रकाश जैन यांनी सोसायटीच्या मेंटेनन्स कॉस्ट, त्यात अंतर्भूत होणार्‍या विविध बाबी, मेंटेनन्स गोळा करताना येणार्‍या अडचणी व त्यावरील उपाय यांची माहिती दिली. रेरा कायदा हा ग्राहक आणि विकासक या दोघांच्या हिताचा महारेरा कायद्याची अंमलबजावणी करणे आवश्यक रेरा नोंदणी कृत प्रकल्पात बुकिंग केल्यास ग्राहक सुरक्षित राहील तसेच रेरा कायदा अंतर्गत मेंटेनन्स ची विविध कलमे, त्यातील कायदेशीर तरतुदी याविषयी माहिती दिली. बँक अकाउंट विषयी माहिती देताना, बँक अकाउंटच्या मूलभूत गरजा आणि घटक, त्याचे महत्व, बँक अकाउंट वापरण्याचे नियम, त्यातून पैसे काढण्याचे नियम व तरतुदी याची माहिती दिली. प्रत्येक वेगळ्या प्रोजेट साठी वेगळे अकाउंट्स आवश्यक असून त्या दृष्टीने महारेराने विविध घटकांकडून सूचना व हरकती मागवल्या आहेत याची माहिती प्रकाश जैन यांनी दिली. सदनिकेच्या बुकिंगमधून येणारी रक्कम ही त्याच सदनिकेच्या प्रोजेटसाठी वापरली गेली पाहिजे या करिता महारेराचे सदैव प्रयत्न आहेत. तसेच महारेरा मधील फॉर्म्सविषयी माहिती देताना, जुने आणि नवीन फॉर्म्समधील बदल, आर्किटेट इंजिनिर्स व सी ए यांनी घ्यावयाची दक्षता इ. विषयी सविस्तरपणे माहिती दिली.

रेरा नोंदणी कृत प्रकल्पात बुकिंग केल्यास ग्राहक सुरक्षित : इंजि. प्रकाश जैन

प्रकाश जैन हे म्हैसूर विद्यापीठाचे गोल्ड मेडलिस्ट असून, २००५-०६ साली ते संस्थेचे अध्यक्ष असताना संस्तेच्या घटना दुरुस्तीचे काम मार्गी लावण्यास पुढाकार घेतला, अएडअ इएडढ डढणउढणठए उरीव ची नियमावली बनवण्यास त्यांचा हातभार होता. ऊ-उश्ररीी, खऊउझठ, कायदा लागू होण्याआधी उपयुक्त सूचना त्यांनी संभंदीत नगर रचना विभागास दिल्या आहेत. सध्या ते रेरा कन्सल्टंट, जुन्या इमारतींचा पुनर्विकास तसेच बांधकाम संभंदीत विषयी मार्गदर्शन करतात, अशी माहिती अध्यक्ष रमेश कारले यांनी दिली या सेशनसाठी पोलाद स्टीलचे यश दायमा, ऐसा अध्यक्ष रमेश कार्ले, उपाध्यक्ष आदिनाथ दहिफळे, सचिव प्रदीप तांदळे, अनिल मुरकुटे, सदानंद कुलकर्णी, रवींद्र बर्डे, आनंद बाफना, गौरव मांडगे, अजय लाल्बागे, अमेय कुलकर्णी, प्रिया कुलकर्णी, विकास गिरी, हर्षदा बारस्कर आणि सभासद उपस्थित होते. उपस्थितांच्या प्रश्नोत्तर व विविध शंकांचे निरसन इंजि. प्रकाश जैन यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इंजि. प्रदीप तांदळे यांनी केले व आभार इंजि. यश शाह यांनी मानले.