अहमदनगर सीए शाखेचे विविध कार्य कौतुकास्पद : सीए रणजीतकुमार आगरवाल

0
28

नगर – आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सीए रणजीत कुमार आगरवाल आणि उपाध्यक्ष सीए चरणजोत सिंह नंदा यांनी नुकतीच अहमदनगर शाखेला भेट दिली. या प्रसंगी त्यांचे पोलिस बँड पथकातर्फे स्वागत करण्यात आले. अध्यक्ष सीए रणजीत कुमार आगरवाल यांनी नगर शाखेचे गौरव केला. देशातील ही पहिली शाखा आहे जी गेली २२ वर्षांपासून अनऑडिटेड बॅलेन्स शीट ३१ मार्च रोजी आणि ऑडिटेड १ एप्रिल रोजी प्रस्तुत करते, तसेच, नगर शाखेचे अध्यक्ष व इतर सर्व टिम उत्कृष्ट कार्य करीत आहे. येत्या वर्षासाठी राष्ट्रीय अध्यक्ष त्याचे दृष्टी या उपक्रमात संकलित केले आहे, ज्याचा अर्थ ’दृष्टी’ आहे आणि ज्याद्वारे या संस्थेला डिजिटलायझेशन (डी), रिसर्च (आर), इंटीग्रिटी (आय), स्किल (एस), हॅण्ड होल्डिंग (एच), ट्रांस्परन्सी (टी) इंडिपेंडेंस (आय) या क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी प्रगती करण्यास मदत होईल. तसेच, संपूर्ण देशात सध्या ४ लाख सीए असून ९ लाखा विद्यार्थी आहेत, २०४७ पर्यंत ३० लाख सीए व्हायला पाहिजेत असे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी उपाध्यक्ष सीए चरणजोत सिंह नंदा यांनी बोलताना सीए इन्स्टिट्यूटचे महत्व संगितले. सीएंना त्यांनी आर्थिक सोल्जर म्हणून संबोधले. तसेच भारतीय सीए जागतिक स्तरावर ओळखले जातात.

आयसीएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष, उपाध्यक्षांची अहमदनगर सीए शाखेला सदिच्छा भेट

बोर्ड ऑफ स्टडीजचे अध्यक्ष सीए, डॉ. राजकुमार अडुकीआ आणि सीसीएम सीए उमेश शर्मा, डब्ल्यूआयआरसीचे माजी अध्यक्ष सीए अर्पित काबरा आणि डब्ल्यूआयआरसी चे विकासा अध्यक्ष सीए पीयूष चांडक हे सुद्धा उपस्थित होते व त्यांनी ही आपले मनोगत थोडयात व्यक्त केले. नगर शाखेचे अध्यक्ष सीए सनित मुथा यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी बोलताना त्यांनी चार वर्षांच्या दीर्घ प्रतिक्षेनंतर राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपाध्यक्ष सीए यांची भेट अहमदनगर सीए शाखेला लाभली आहे असे संगितले, तसेच, नगर शाखेबद्दल माहिती देऊन या वर्षात होणार्‍या नवीन उपक्रम जसे नवीन सोलार प्रोजेट, नवीन लायब्ररी, वेग्वेग्ल्य विषयांवर सेमिनार, स्पोर्ट्स इवेंट, यावर्षी आरआरसी तिरुपति येथे घेण्यात आहे याबद्दल माहिती दिली. सीए बेनोवेलंट निधीसाठी नगर शाखेच्या वतीने १ लाख ११ हजार एकशे अकरा रूपयांची सहायता देण्यात आली. हा धनादेश सीए रणजीत कुमार आगरवाल यांचेकडे सुपूर्द करण्यात आला. या वेळी माजी अध्यक्ष सीए मोहन बरमेचा, सीए संजय देशमुख, सीए अजय मुथा, सीए मिलिंद जांगडा, सीए सुशील जैन, सीए प्रसाद भंडारी, सीए (डॉ) परेश बोरा, सीए किरण भंडारी, सीए संदीप देसरडा हे उपस्थित होते. सूत्रसंचालन सीए आयूषी कसवा आणि सीए काजल चंदे यांनी केले तर सीए प्रसाद पुराणिक यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सीए सनित मुथा, सीए प्रसाद पुराणिक, सीए अभयकुमार कटारिया, सीए महेश तिवारी, सीए ज्ञानेश्वर काळे, सीए पवनकुमार दरक आणि नगर विद्यार्थी शाखेचे सभासद यांनी परिश्रम घेतले.