निर्मलनगरमध्ये भरदिवसा घरफोडी

0
35

कॅमेरे, लेन्स व रोकड चोरट्यांनी पळविली

नगर – अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून बेडरूम मधील टेबलवर ठेवलेले फोटो व व्हिडिओ शुटींगसाठी वापरले जाणारे कॅमेरे, लेन्स व सात हजारांची रोख रक्कम चोरून नेली. ३ मे रोजी निर्मलनगर येथील एका अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी मधुकर भगवान खेडकर (वय ३३, रा. रुपाली हाईट्स, भगवानबाबा चौक, निर्मलनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते ३ मे रोजी सकाळी व्हिडिओ शूटिंच्या कामासाठी बाबूर्डी घुमट येथे गेलेले असताना ही घटना घडली. सोनी कंपनीचा कॅमेरा, निकॉन कंपनीचा कॅमेरा, लेन्स व सात हजार रुपये रोख रक्कम असा ५० हजारांचा ऐवज चोरीला गेला आहे. अधिक तपास अंमलदार दिपक गांगर्डे हे करत आहेत.