मुकुंदनगरसह भिंगारमध्ये पोलिसांचा रुट मार्च

0
27

लोकसभा निवडणुक निर्भयपणे पार पडण्याकरीता भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार यांचे सह बीएसएफ च्या जवानांनी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशन हद्दीत मुकूंदनगर भागात इरिगेशन मस्जिद- बॉम्बे बेकरी-दरबार चौक-सहारा कॉर्नर-नगरी चहा-संभा टपरी चौक- फकीरवाडा रोड-वाबळे कॉलनी-बॉम्बे बेकरी व इरीगेशन मस्जिद असा तसेच भिंगार शहरात पंचशिल कमान-खळेवाडी-नेहरु चौक-शिवाजी चौक-ब्राम्हण गल्ली-भिंगार वेस-गवळीवाडा-सदर बाजार या भागात रुट मार्च घेण्यात आला. रुट मार्च करीता भिंगार कॅम्प चे स.पो.नि. योगेश राजगुरु, बीएसएफ बटालियन अधिकारी व जवान तसेच आरपीसी प्लाटुनचे जवान उपस्थित होते.