नगर शहर परिसरातून आणखी २ अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता

0
27

फुस लावून पळवून नेल्याचा संशय, २ वेगवेगळे गुन्हे दाखल

नगर – नगर शहरातून तसेच तालुयातील एका गावातून दोन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी पीडित मुलींच्या नातेवाईकांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली व नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तेलीखुंट परिसरात राहणार्या एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला गुरूवारी (दि. २) दुपारी अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा तोफखाना पोलिस ठाण्यात दाखल झालेला असतानाच केडगाव उपनगरातुनही एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याचे समोर आले आहे. केडगाव उपनगरात राहणार्‍या पिडीत मुलीच्या वडिलांनी याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

त्यांच्या अल्पवयीन मुलीचे त्यांनी गुरूवारी (दि.२) सकाळी एका शाळेत अ‍ॅडमिशन केले व तिला घरी सोडले. फिर्यादी कामावर निघून गेले असता मुलगी केडगाव परिसरात राहणार्‍या आजीकडे जाते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती आजीकडे गेलीच नसल्याचे समोर आले आहे. तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस मुलीचा शोध घेत आहेत. दरम्यान नगर तालुयातील वाळुंज गावच्या शिवारातूनही एका अल्पवयीन मुलीला आरोपी प्रशांत बापू खंडागळे (रा. कारखेल, ता.आष्टी, जि. बीड) याने कशाची तरी फुस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत मुलीच्या आईने शुक्रवारी (दि.३) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी प्रशांत खंडागळे याच्या विरुद्ध भा.दं.वि.कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.