लालटाकी रोडवर जीवघेणा खड्डा

0
76

येथील लालटाकी रोडवर अण्णाभाऊ साठे चौकाजवळ महानगरपालिकेने ५ दिवसांपासून खड्डा खोदून ठेवला आहे, भर रहदारीच्या रस्त्यावर या खड्ड्यामुळे धोका उदभवू शकतो सुमारे ६ फूट खोल हा खड्डा असून एखादी बाईक यात गेली तरी समजणार नाही असा आहे, या ठिकाणी कोणताही सूचना फलक लावलेला नाही एका साईडने एक बॅरिकेट आहे तर दुसर्‍या बाजूला पत्रा टाकलेला आहे तो रात्रीच्या वेळेस लाईट गेल्यास दिसणार नाही व अपघाताचा धोका होऊ शकतो, येथील ड्रेनेज लाईन चोकअप झाल्याने मनपाने दुरुस्ती साठी खड्डा घेतला आहे. पण ५ दिवसात त्यांना फॉल्ट सापडला नाही तरी आयुक्त यांनी लक्ष घालून हे काम पूर्ण करून हा जीवघेणा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.