‘श्री मार्कडेंय मंदिर’ सभा मंडपाचा ८,९ व १० मे रोजी होणार ‘जिर्णोध्दार’

0
26
Oplus_131072

 

अहमदनगर शहरातील संपुर्ण जिल्हयातील पद्मशाली समाजाचे आराध्य दैवत महामृत्यूंजय श्री मार्कडेंय महामुनी मंदिर सभामंडपाचे जिर्णोध्दार आळंदी येथील श्री द्विगविजयनाथ महाराज, डोंगरगण येथील ह.भ.प. जंगले महाराज शास्त्री व श्री विशाल गणेश मंदिराचे श्री संगमनाथ महाराज यांचे हस्ते तसेच जिल्हाधिकारी सिध्दाराम सालिमठ, जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला, महानगरपालिकेचे आयुक्त पंकज जावळे, धर्मादाय उपायुक्त श्रीमती पाटील, कोतवाली पोलीस स्टेशनचे पो.नि. प्रताप दराडे व तोफखाना पोलीस स्टेशनचे पो. नि. आनंद कोकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची माहिती पद्मशाली पंचकमेटी ज्ञाती समाज, श्री मार्कडेंय देवस्थान कमेटी, पद्मशाली विद्याप्रसारक मंडळ व समस्त पद्मशाली समाज बांधवांतर्फे दिली आहे. श्री मार्कडेंय मंदिर हे १०२ वर्षापुर्वी १९२२ साली स्थापन झालेली एैतिहासिक मंदिर असून मंदिरातील श्री मार्कडेंय महामुनींची मुर्ती ८ मे १९७० साली स्थापन झालेली असून या मुर्तीला ५४ वर्ष पुर्ण झालेली आहे, त्याचेच औचित्य साधुन व हिंदु धर्मातील साडेतीन मुहूर्तापैकी एकमुहूर्त अक्षय तृतीया या दिवशी मंदिर सभामंडपाचे भुमीपुजन आयोजीत केले आहे. या धार्मिक कार्यक्रमामध्ये ८ मे रोजी सकाळी ७.३० ते ९ वा. पर्यंत श्री षडविनायक पुजन, पुण्याहवाचन व श्री मार्कडेंश्वर रुद्राभिषेक, सकाळी ९ ते ११.३०वा. पर्यंत श्री मातृका पुजन, श्री नक्षत्र पूजन व श्री चतूषस्ट योगिनी पुजन व सायंकाळी ७ वा. श्री मार्कडेंश्वराचे संध्या आरती, भजन व प्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे. ९ मे रोजी सकाळी ७.३० ते १० पर्यंत मंदिरातील इतर सर्व देवतांचे अभिषेक पुजन, क्षेत्र पालक पुजन, वास्तुमंडल अधिष्ठान देवता पूजन व श्री नवग्रह पूजन, सकाळी ११ वा. यज्ञविधी (होम हवन) तसेच सायंकाळी ७ वा. श्री मार्कडेश्वराचे संध्या आरती व रात्री ८ वा. श्रीराम भक्त हनुमान संत्संग मंडळ ट्रस्ट, श्रीराम मंदिर नवीपेठ यांचे भव्य हनुमान चालिसा व त्यानंतर प्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे. १० मे रोजी सकाळी ७.३० वा. श्री मार्कडेंश्वर रुद्राअभिषेक व भजनसंध्या व दुपारी ११ वा. श्री मार्कडेंय सभा मंडप भुमीपुजन समारंभ व त्यानंतर महाआरती व प्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पद्मशाली समाजातील व श्री मार्कडेंय महामुनींवर श्रध्दा असणा-या भक्तांनी उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पद्मशाली समाज बांधवांच्या वतीने गणेश विद्ये, श्रीनिवास बोज्जा, अ‍ॅड.राजू गाली, दत्तात्रय रासकोंडा यांनी केले आहे.