‘विचार भारती’च्या मतदार जनजागृती मोहिमेला शहरात प्रतिसाद

0
13

नगर – विचार भारतीच्या नुकत्याच झालेल्या जनसंवाद या उपक्रमाचा दुसरा भाग म्हणून १०० टक्के मतदान होण्यासाठी मतदार जागर अभियानास सुरवात झाली आहे. जागर मतदारांचा या अभियानात विचार भारतीच्या वतीने नगर शहरात २५ ठिकाणी सेल्फी पॉइंट उभे केले असून त्याद्वारे आपले मतदान कशासाठी याबाबत जागर व आवाहन करण्यात येत आहे. या अभियानाचा शुभारंभ महानगरपालिके जवळील पावन गणपती मंदिरात जागतिक कीर्तीच्या चित्रकार अनुराधा ठाकूर यांच्या हस्ते झाला. तसेच ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिर व दिल्लीगेट येथील शमी गणपती मंदिर येथे शल्य चिकित्सक डॉ. सतीश सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. सेल्फी बॅनर वर छापलेले घोषवाय भावल्याने सर्व ठिकाणांच्या सेल्फी पॉइंटवर नागरिकांनी सेल्फी घेत १०० टक्के मतदानाचा संकल्प केला. हा उपक्रम १३ मे पर्यंत शहरात राबवण्यात येणार आहे. यावेळी अनुराधा ठाकुर म्हणल्या, आपला भारत हा सर्व जगात सर्व मोठी लोकशाही असलेले राष्ट्र आहे. त्यामुळे नागरिकांनी खुप सजग राहून कर्तव्याच्या भावनेने आपल्या लोकशाहीसाठी योग्य ठिकाणी मतदान करणे आवशयक आहे. देशाची प्रगती आता खूप वेगाने होत आहे. त्यामुळे आगामी काळात देशात मोठे अमुलाग्र बदल दिसणार आहेत. आपल्या भारताच्या विकासासाठी सर्व नागरिकांनी मतदानाचे कर्त्यव्य न चुकता राबबावे. विचार भारतीच्या वतीने नारी शक्तीचा सन्मानासाठी हा उत्कृष्ट उपक्रम राबवला आहे. डॉ. सतीश सोनवणे म्हणाले, लोकशाहीच्या व राष्ट्राच्या हितासाठी १०० टक्के मतदान होणे आवश्यक आहे. यासाठी विचार भारतीच्या वतीने जनजागृतीचा योग्य व अत्यावश्यक उपक्रम हाती घेतला आहे.

नागरिकांनी या मोहिमेस प्रतिसाद द्यावा, असे आवाहन केले. प्रास्ताविकात ब्रॉडकस्ट प्रमुख मनोज झंवर यांनी उपक्रमाची माहिती देत सांगितले, विचार भारतीच्या वतीने शहरात २५ महत्वाच्या ठिकाणी सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत. सेल्फी बुथवर लावण्यात येणार्‍या सेल्फी फलकावर मतदान जागृतीसाठी विविध घोषवाय लिहिण्यात आलेली आहेत. यामध्ये माझे मत अखंड भारतासाठी, माझी संपत्ती माझा अधिकार त्यासाठी १०० % मतदान, नारी शक्तीचा निर्धार त्यासाठी १००% मतदान, भयमुक्त अहिल्यानगर त्यासाठी १००% मतदान, काशी व मथुरेचे उत्थान त्यासाठी १००% मतदान व लव्ह जिहाद करू हद्दपार त्यासाठी १००% मतदान. या आशयाचे घोषवाय लिहिण्यात आलेली आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी जेथे शय असेल त्याठिकाणी विचार भारतीच्या सेल्फी बुथवर जावून स्वतःचा सेल्फी घेऊन तो इंस्टाग्रामवर पोस्ट करावा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सुधीर लांडगे यांनी केले. उपाध्यक्ष अनिल मोहिते यांनी आभार मानले. यावेळी भारतीचे प्रवर्तक रवींद्र मुळे, अ‍ॅड.सुधीर झरकर, रवींद्र बारस्कर, कमलेश भंडारी, डॉ.विक्रम दीडवाणिया, मनीषा मुळे, दिपाली दीडवाणिया, किरण बारस्कर, माया बाबळे, मयूर बोचूघोळ, बल्लू सचदेव, रणजीत वाकळे, विशाल गणपती मंदिराचे ट्रस्टी पंडित खरपुडे, अनंत देसाई, किशोर गांधी, सौ. गांधी, मिलिंद क्षीरसागर आदी उपस्थित होते.