निर्भय, निष्पक्षपणे लोकसभा निवडणूक पार पाडा : रविकुमार अरोरा

0
6

नवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक निरीक्षक यांची मनपात बैठक

नगर – १३ मे रोजी होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी १०० टक्के मतदान घडवून आणण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करा, तसेच मतदान केंद्रावर मतदारांसाठी सुविधा उपलब्ध करून द्या, निर्भय, निष्पक्षपणे लोकसभा निवडणूक पार पाडा अशा सूचना यावेळी निवडणूक निरीक्षक रविकुमार अरोरा यांनी दिल्या. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहमदनगर मनपा हद्दीतील लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक निरीक्षक रविकुमार अरोरा यांनी मनपात बैठक घेतली. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त विजयकुमार मुंडे, उपायुक्त सपना वसावा, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे आदी उपस्थित होते. यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी बैठकीत सांगितले की मनपा हद्दीत मतदानाचा टक्का वाढावा यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती केली, याचबरोबर जनजागृतीचा रथ शहरात फिरत आहे, पथनाट्य, विविध संघटना, बचत गट याद्वारे मतदानासाठी जनजागृती करण्यात आली. लोकसभा निवडणुकीसाठीची तयारी अहमदनगर मनपा हद्दीत जोरदार सुरु आहे. अशी माहिती त्यांनी दिली.