अवैधरित्या रिफिलिंगसाठी चालविलेल्या ६० गॅस टाक्या पकडल्या सर्जेपुरा-रामवाडी रोडवर पोलिसांची कारवाई

0
8

नगर – अवैधरित्या रिफिलिंग साठी चालविलेल्या ६० गॅस टाया घेवून जाणारा टेम्पो तोफखाना पोलिसांनी पकडला आहे. शहरातील सर्जेपुरा ते रामवाडी जाणार्‍या रोडवर रविवारी (दि.२८) ६.३५ च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. पोलिस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालणार्‍या पथकाला सर्जेपुरा ते रामवाडी जाणार्‍या रोडवर ६० गॅस टाया घेवून जाणारा टेम्पो दिसला. पोलिसांना या टेम्पो बाबत संशय आल्याने त्यांनी टेम्पो थांबवून चौकशी केली असता टेम्पो चालकाकडे कुठलीही परवानगी आढळून आली नाही. त्याच्या कडे सखोल चौकशी केल्यावर त्याने अवैधरित्या रिफिलिंग साठी या गॅस टाया चालविल्याअसल्याची कबुली दिली. त्याच्या ताब्यातून टेम्पो तसेच त्यातील भारत गॅस कंपनीच्या २४ भरलेल्या टाया, एच पी कंपनीच्या ३६ रिकाम्या घरगुती गॅस टाया असा सुमारे ३ लाख ३४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. टेम्पो चालक आशुतोष रोहिदास मोकाटे (रा. भाकरे गल्ली, सर्जेपुरा) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.