निवडणूक प्रचार रॅलीत गेल्याच्या रागातून केडगावमध्ये तरूणाला बेदम मारहाण

0
52

नगर – रॅलीत गेल्याच्या रागातून तरूणाला चौघांनी मारहाण केल्याची घटना केडगाव बायपास चौक परिसरातील अण्णा ढाब्या समोर घडली. संकेत बंडू पवार (वय २८, रा. शाहुनगर, केडगाव) असे मारहाण झालेल्या तरूणाचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत बाळासाहेब गारकर, चिकु सुनील साळवे, सचिन शिंदे, अमोल हुलगे (सर्व रा. शाहुनगर, केडगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संकेत हे दोन दिवसापूर्वी नगर शहरातून निघालेल्या रॅलीत सहभागी झाले होते. याच कारणातून त्यांना चौघांनी बुधवारी (दि. २४) पहाटे तीनच्या सुमारास केडगाव बायपास चौक परिसरातील अण्णा ढाब्या समोर लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केले. त्यांचा मोबाईल फोडून नुकसान केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार शिंदे अधिक तपास करत आहेत.